मराठी सिनेसृष्टीसह (Marathi Film Industry) बॉलिवूडमध्ये (Bollywood) दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकणारे मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) सध्या चर्चेत आले आहेत. अजिंक्य देव हे सोशल मीडियाच्या माध्यमातून असो वा एखाद्या मुलाखतीमध्ये असो ते नेहमी स्पष्टपणे बोलत असतात.
नुकताच त्यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आठवणींना (Ajinkya Deo On Balasaheb Thackeray) उजाळा दिला आहे. आज महाराष्ट्राला बाळासाहेबांची खरी गरज होती असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देताना अजिंक्य देव खूपच भावुक झाले. त्यांनी सांगितले की, 'बाळासाहेब ठाकरेंना मी अनेकदा भेटलो होतो. बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी मी अनेक वेळा मातोश्रीवर गेलो होतो. ठाकरे आणि देव कुटुंबाचं नातं खूपच खास आहे. बाळासाहेबांचं कमाल वाटावं असं वलय होतं. पण लहानपणी मला त्यांच्या या वलयाबद्दल माहिती नव्हतं. मी लहानपणी त्यांच्या मांडीवर देखील बसलो होतो. पण पुढं मोठं झाल्यावर मला त्यांच्याबद्दल कळू लागलं.'
अंजिक्य देव यांनी पुढे सांगितले की, 'बाळासाहेब ठाकरे हे अद्भूत व्यक्ती आहेत. माझ्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते सेटवर आले होते. त्यावेळी बापाचं नाव मोठं करशील असा आशीर्वाद त्यांनी मला दिला होता. त्यांचं बोलणं स्फुर्तीदायक होतं. एखादी गोष्ट प्लॅन न करता ते मनापासून बोलत असे. महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरेंची खरी गरज होती. पण मला त्यांचा आशीर्वाद मिळाला यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. देव कुटुंबाला ठाकरे कुटुंबाने नेहमीच मदत केली आहे.'
यावेळी अजिंक्य देव यांनी ते सिनेसृष्टीत कसे आले आणि अभिनयाचा वारसा त्यांना कसा मिळाला हे देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले. ते म्हणाले की, 'आई-बाबांमुळे मी या इंडस्ट्रीत आलो आहे. मी इंडस्ट्रीत यावे अशी माझ्या आईची इच्छा नव्हती. माझ्या इंडस्ट्रीतील पदार्पणावरुन आई-बाबांचे वाद देखील झाले असणार. पण कुठेतरी मला मनोरंजनसृष्टीची गोडी निर्माण झाली होती. पण 'सर्जा'च्या शूटिंग आधापासूनच बाबांनी मला अभिनयक्षेत्राची ओळख करुन दिली होती. मी या क्षेत्रात नाव कमवावं अशी त्यांची फार इच्छा होती.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.