Chhagan Bhujbal News: 'मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं'; धमकी मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal News: धमकी मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
chhagan bhujbal
chhagan bhujbal Saam tv
Published On

तबरेज शेख

Chhagan Bhujbal News:

मंत्री छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'मराठा आरक्षणाला विरोध केला तर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी छगन भुजबळ यांना मिळाली होती. या धमकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं आहे, अशी पहिली प्रतिक्रिया धमकी मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी दिली आहे. (Marathi Latest News)

छगन भुजबळ यांनी काल धमकी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ म्हणाले, 'मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाहीतर अनेकवेळा येत आहेत. जिवंत राहणार नाही, तुझी वाट लावू, अशा आशयाच्या धमक्या येत आहेत. तसेच शिवीगाळ सुरू आहे. मात्र, अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. पोलिसांत तक्रार केली आहे, आता पोलीस काय ते बघतील'.

chhagan bhujbal
Jarange Patil News: 'मोदीसाहेब फडणवीसांना समज द्या, खालचे कार्यकर्ते अंगावर घालू नका...' : जरांगे पाटील

'शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. मी ओबीसीच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली. मला मराठ्यांनी मोठे केले असे सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलं आहे. मला मराठा समाजाची मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत काम केलं आहे, असे छगन भुजबळ पुढे म्हणाले.

'माझं देखील काहीतरी योगदान आहे. त्यामुळे मला संधी दिली. माझा समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे. मी एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही. मी ओबीसीसाठी काम करत आहे. मला महादेव जानकर यांनी समर्थन दिले असून मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचे काम आहे, असे भुजबळ पुढे म्हणाले.

chhagan bhujbal
Manoj Jarange: १०० एकरात सभा घेण्यासाठी एवढे पैसे कुठून आलेत? भुजबळांच्या 'त्या' प्रश्नाला जरांगेंचं सडेतोड उत्तर

'राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळे आणि टिकणारे आरक्षण द्या. मी मनोज जरांगे पाटील यांचे काय खाल्लं आहे, हे त्यांनी सांगावं. आता मनोज जरांगे पाटील कुणाचे खात आहे, हे त्यांनी सांगावं, असा सवाल देखील भुजबळ यांनी जरांगे यांना यावेळी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com