Stree 2 Promo: राजकुमार राव स्टारर 'स्त्री २'चा नवा प्रोमो आउट, रिलीज डेटही आली समोर

Stree 2 Movie Promo Released: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' चित्रपटाचा प्रोमो शेअर करण्यात आला असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
Stree 2 Promo: राजकुमार राव स्टारर 'स्त्री २'चा नवा प्रोमो आउट, रिलीज डेटही आली समोर
Stree 2 Promo ReleasedSaam TV

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'स्त्री २' (Stree 2) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्त्री' ला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आता 'स्त्री २' येणार आहे. 'स्त्री २' ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. 'मुंज्या' चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान १४ जूनपासून 'स्त्री २'चा टीझर प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. अशातच या चित्रपटाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केलेली आहे.

Stree 2 Promo: राजकुमार राव स्टारर 'स्त्री २'चा नवा प्रोमो आउट, रिलीज डेटही आली समोर
Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट्ट पुन्हा एकदा डीपफेकची शिकार, अभिनेत्रीचा नवा ट्रेंडिंग व्हिडीओ होतोय व्हायरल

राजकुमार राव (Rajkummar Rao), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) 'स्त्री' (Stree) चित्रपटाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी 'स्त्री २'ची घोषणा केली होती. नुकतंच निर्मात्यांनी 'स्त्री २'चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमो शेअर करताना कॅप्शन दिलंय की, "इस स्वतंत्र्यता दिवस, आ रही है स्त्री फिर से" 'स्त्री २' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचा टीझर 'मुंज्या' चित्रपटासोबत दाखवला जाणार, अशी घोषणा करण्यात आली होती. 'मुंज्या' चित्रपट थिएटरमध्ये ७ जूनला रिलीज झाला आहे. अशातच या चित्रपटासोबत आजपासून (१४ जूनपासून) आता 'स्त्री २' चित्रपटाचा टीझरही थिएटरमध्ये दाखवला जाणार आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर मॅडॉक फिल्म्सने ‘स्त्री २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 'स्त्री २'च्या शूटिंगला सुरुवात जून २०२३ पासून झालेली होती.

Stree 2 Promo: राजकुमार राव स्टारर 'स्त्री २'चा नवा प्रोमो आउट, रिलीज डेटही आली समोर
Maharaj Film : आमिर खानच्या मुलाचा 'महाराज' चित्रपट सध्या प्रदर्शित होणार नाही, हायकोर्टानंच थांबवलं; काय आहे वादाचं कारण?

'स्त्री' चित्रपट २०१८ साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट फक्त थिएटरमध्येच नाही तर, ओटीटीवरही प्रचंड गाजलेला आहे. हा बहुचर्चित चित्रपट तुमचा पाहायचा राहिला असेल तर नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत, श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Stree 2 Promo: राजकुमार राव स्टारर 'स्त्री २'चा नवा प्रोमो आउट, रिलीज डेटही आली समोर
Radhika Merchent Pre Wedding Look : अंबानींची सौंदर्यवती सूनबाई ! राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग लूकने वेधलं लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com