हास्यजत्रा फेम शिवाली परबला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. नेहमीच हटक्या विनोदी शैलीमुळे चर्चेत राहणाऱ्या कल्याणच्या चुलबुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, पहिला स्टेज परफॉर्मन्सचा अनुभव सांगताना शिवाली भावूक झाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून सर्वाधिक प्रकाशझोतात आलेली शिवाली परब नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवालीला तिचा चाहतावर्ग शिवाली म्हणून नाही तर, ‘कल्याणची चुलबुली’ नावानेच ओळखते. हास्यजत्रेतही तिला त्याच नावाने पुकारलं जातं. नुकतंच शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने स्ट्रगलच्या काळातली हळवी आठवण सांगितली आहे.
शिवाली व्हिडीओमध्ये म्हणते, “ माझ्या आयुष्यातला पहिला इव्हेंट म्हणजे ‘आगरी महोत्सव’ हा इव्हेंट आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी या स्टेजवर परफॉर्म करते. तेव्हा मी मागे असलेल्या ५- ६ मुलींच्या मध्ये उभी होते. आणि आज मी डायरेक्ट लीड ॲक्ट्रेस म्हणून उभी आहे. या कार्यक्रमामध्ये आज मी स्वत:चं स्किट सादर करते.” असं शिवाली या व्हिडीओमध्ये म्हणाली. (Social Media)
व्हिडीओ शेअर करताना शिवाली म्हणते, “ ‘आगरी महोत्सव’ हा व्हिडीओ खास आहे कारण की, मी ह्या मंचावर माझ्या स्ट्रगलच्या काळात एक स्कीट परफॉर्म केला होता आणि हा आगरी महोत्सव असिस्ट सुद्धा केला होता. त्या वेळेस सहकलार म्हणून ६ जणांमध्ये मी ही होते आणि आज त्याच मंचावर सेलिब्रिटी गेस्ट म्हणून स्वतःचं स्कीट परफॉर्म केलं… खूप छान वाटलं, थोडं मन भरुन आलं…. असंच तुम्हा सगळ्यांच प्रेम आणि आशिर्वाद माझ्यासोबत असू द्या… धन्यवाद” असं कॅप्शन देत शिवालीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या ह्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून तिच्या अभिनयाचे कौतुक केले. (Tv Serial)
शिवाली परबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोबतच ती काही ट्रॅक सॉंगमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. शिवालीने ‘चंद्रमुखी’ चित्रपटामध्ये छोट्या चंद्राचे पात्र साकारले होते. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.