

हार्ट अटॅक हा आजही मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक मानला जातो. योग्य वेळी उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो. मात्र जर उपचारांना उशीर झाला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक हार्ट अटॅक येण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत दर 40 सेकंदाला एका व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. दरवर्षी सुमारे 8,05,000 हार्ट अटॅक येतात. यामध्ये सुमारे 6,05,000 लोकांना पहिल्यांदाच अटॅक येतो. तर 2,00,000 लोकांना पुन्हा अटॅक येत असल्याची माहिती आहे.
प्रत्येक पाचपैकी एक हार्ट अटॅक हा सायलेंट असतो. म्हणजेच त्या वेळी शरीराला नुकसान होत असतं. पण व्यक्तीला त्याची लक्षणं जाणवत नाहीत. ही लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया.
अचानक चक्कर येणं, डोकं हलकं वाटणं किंवा अस्वस्थ वाटणं हे हार्ट अटॅकचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. हार्ट फाउंडेशनच्या माहितीनुसार, जर अचानक आजूबाजूच्या गोष्टी फिरत असल्यासारख्या वाटू लागल्या तर याचा अर्थ हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाहीये.
व्यायाम करताना धाप लागणं सामान्य असतं. परंतु विश्रांती घेत असतानाही अचानक श्वास घेण्यास त्रास होणं किंवा कोणतंही स्पष्ट कारण नसताना दम लागणं हे हृदयाशी संबंधित समस्या असल्याचं लक्षणं असतं.
पोटात होणारा त्रास नेहमीच हृदयाशी संबंधित असतो असं नाही. पण सतत मळमळ होणं, अॅसिडिटीसारखा त्रास जाणवणं किंवा उलट्या होणं हे काही वेळा हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात.
काही वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत आणि हीच सर्वाच चिंतेची बाब असते. अशा प्रकारच्या झटक्याला सायलेंट हार्ट अटॅक असं म्हटलं जातं. यात व्यक्तीला फारसा त्रास जाणवत नाही किंवा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. हार्ट फाउंडेशनच्या मते, अशा परिस्थितीत अटॅक आल्याचं लगेच लक्षात येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.