येणारं नवीन वर्ष सर्वच राजकीय पक्षांसाठी खूपच महत्वाचे असणार आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपसोबत सर्वच पक्षांकडून आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशामध्ये मराठी सिनेसृष्टीचे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. '२०२४ मध्ये पुन्हा भाजपच येणार असून नरेंद्र मोदीच पंतप्रधान (PM Narendra Modi) होणार', असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
'झी' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकरांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, 'तुम्ही बघाच मोठ्या संख्येने भाजपच येणार. कोण येईल आणि कसा येईल हे सांगता येत नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० ते ३७५ जागा मिळतील. देशामध्ये भाजपाशिवाय पर्याय नाही. भाजपकडून ऐवढं चांगलं काम चालले आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.'
या वक्तव्यामुळे नाना पाटेकर चर्चेत आले आहेत. त्यांचा या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामुळे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशामध्ये या निवडणुकीमध्ये यंदा कोणाचे सरकार येणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. अशामध्ये नाना पाटेकरांनी भाजपचेच सरकार येणार असल्याचा जो विश्वास व्यक्त केला आहे. त्यांचा विश्वास कितपत खरा ठरतोय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर लवकरच 'ओले आले' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.