Gautami Deshpande Wedding: तेंडुलकरांची झाली गौतमी! स्वानंद- गौतमीचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, लग्नाचे फोटो व्हायरल

Gautami And Swanand Marriage: गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. गौतमी आणि स्वानंद यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Gautami Deshpande Wedding
Gautami Deshpande WeddingSaam Tv
Published On

Gautami Deshpande And Swanand Tendulkar:

2023 हे वर्ष मराठी सिनेसृ्ष्टीतील अनेक सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरत आहे. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. या लिस्टमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. ‘माझा होशील ना’ मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आज विवाहबंधनात अडकली.

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) यांचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाहसोहळा (Gautami Deshpande Wedding) पार पडला. गौतमी आणि स्वानंद यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत गौतमी आणि स्वानंदने प्रेमाची कबुली दिली होती.

गौतमी देशपांडे गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण चार दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि अखेर आज गौतमीने स्वानंदसोबत लग्न केले.

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांच्या लग्नाच्या विधीला गेल्या दोन दिवसांपासूनच सुरूवात झाली होती. त्यांचे मेहंदी, हळद आणि संगीत सिरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या वाइल्डर्नेस्ट हिलटॉप रिसॉर्टमध्ये त्यांचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. याच रिसॉर्टमध्ये त्यांच्या लग्नाचे सर्व विधी पार पडले. या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गौतमी आणि स्वानंद लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. गौतमीने ऑफ व्हाइट आणि लाइट पिंक कलरची बॉर्डर असलेली सुंदर साडी नेसली आहे. तर स्वानंदने तिच्या साडीला मॅचिंग अशी शेरवानी परिधान केली आहे. नववधूच्या रुपामध्ये आणि मराठमोळ्या लूकमध्ये गौतमी खूपच गोड दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर गौतमी आणि स्वानंदवर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत प्रेम व्यक्त करत आहेत.

Gautami Deshpande Wedding
Gautami Patil New Song: गौतमी पाटील पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत , 'चीझ लई कडक' प्रेक्षकांच्या भेटीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com