अगदी शाळेपासून ते तारुण्यात येईपर्यंत अनुभवलेली प्रेमकहाणी कायमच अविस्मरणीय असते. बालिश बुद्धीला पटेल अशी काहीशी त्या प्रेमाची रचना असते. प्रेमीयुगुलांकरिता अशीच मनमोहून टाकणारी रोमँटिक प्रेमकहाणी एका नव्याकोऱ्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पावसाळ्यातील हा रोमांचकारी अनुभव मनाला स्पर्शून जाणरा आहे. 'पायल वाजे...' असे बोल असणारं हे प्रेमगीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतंय. अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता सूरज नेवरेकर ही जोडगोळी या रोमँटिक गाण्यात बांधली गेली आहे. 'व्हीआर म्युझिक स्टेशन' प्रस्तुत हे गाणं एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर सज्ज आहे.
'पायल वाजे' हे गाणं 'व्हीआर म्युझिक स्टेशन' व 'स्वरनिर्मित प्रॉडक्शन' प्रस्तुत असून या गाण्याच्या निर्मितीची धुरा सीएम राठोड व मितेश चिंदरकर यांनी पेलवली आहे. 'व्हीआर म्युझिक' म्हणजेच विशाल राठोड यांची आजवर अनेक गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत, अशातच त्यांच्या या 'पायल वाजे' या नव्या कोऱ्या गाण्याने एन्ट्री केली असून हे गाणं ही प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे.
या गाण्याच्या दिग्दर्शनाची बाजू रोहित मोहिते व रोहित कोटेकर यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक गाण्याला लरीसा अलमेडिया यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. (Entertainment News)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हीचा अभिनय तर साऱ्यांनाच माहीत आहे, आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे. तिच्या या गाण्यातील अनुभवाबद्दल बोलताना शिवाली म्हणाली की, "सर्वप्रथम मी 'व्हीआर म्युझिक'चे आभार मानते. विशाल राठोड यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. या आधीही आम्ही एकत्र काम केलं आहे, त्यांची कामाची पद्धत, आणि त्यांना माझ्या कामाची पद्धत आवडत असल्याने कदाचित एकत्र काम करण्याचा योग सतत येत आहे. 'पायल वाजे' या गाण्याला कमी कालावधीत लोकप्रियता मिळाली, आणि हस्यजत्रेसोबत गाण्यातूनही माझ्यावर प्रेक्षक प्रेम करत आहेत, हे पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. 'व्हीआर म्युझिक'ला, 'पायल वाजे' या गाण्याला व मला असंच भरभरून प्रेम द्या हीच विनंती".
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.