Vivek Agnihotri Is Bankrupt: 'द काश्मीर फाईल्स'मधून ३४० कोटी कमावणारे विवेक अग्निहोत्री कंगाल; म्हणाले 'आता पुन्हा...'

Vivek Agnihotri On Movie: 340 कोटींहून अधिक कमाई करून रेकॉर्ड ब्रेकिंग 'द काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाला आता पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे.
Vivek Agnihotri get bankrupt
Vivek Agnihotri get bankruptSaam Tv
Published On

Vivek Agnihotri Won't Make Movies For Profit :

'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. मात्र या यशस्वी चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री हतबल झाला आहेत. खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी याचा खुलासा केला आहे.

भारतात 250 कोटींहून अधिक आणि जगभरात 340 कोटींहून अधिक कमाई करून रेकॉर्ड ब्रेकिंग 'द काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाला आता पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. करोडोंची कमाई करूनही विवेक अग्निहोत्रींवर ही वेळ कशी आली, याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

'द कश्मीर फाइल्स' या वादग्रस्त आणि यशस्वी चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता बॅंक्रप्ट झाले असून आता त्यांना त्याचा पुढचा चित्रपट बनवण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. नुकतेच त्यांनी हे वक्तव्य करून पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे.

Vivek Agnihotri get bankrupt
Jailer Box Office Collection: रजनीकांतच्या चित्रपटाचा धुमाकूळ; 'जेलर' 3 दिवसात ओलांडणार 100 कोटींचा टप्पा

हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिनेमात हिंसाचाराला ग्लॅमर करणे याला टॅलेंट म्हणतात. 'द काश्मीर फाइल्स'मध्ये दाखवलेल्या हिंसाचाराचे काय?

त्याला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'मी हिंसाचार घडवला नाही. मी त्या हिंसाचाराचा गौरव केलेला नाही. हिंसाचार जसा घडला तसा मी दाखवला आहे. युद्ध दाखवण्यात काही गैर नाही.

पण तुमच्या मुलांना तुम्ही सतत युद्धाचे खेळ दाखवता, जिथे तो सगळ्यांना मारतो विनाकारण मारत असतो, हे चुकीचे आहे. हिंसेसाठी हिंसेचार करणे आणि त्याचा गौरव करणे चुकीचे आहे. पण हिंसेचा वापर मानवतेला मारण्यासाठी कसा केला जातो हे दाखवणे अजिबात चुकीचे नाही. (Latest Entertainment News)

Vivek Agnihotri get bankrupt
Sushmita Sen Received Doctorate: सुष्मिता सेनच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा; पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद

दिग्दर्शकाला विचारण्यात आले की, 'द काश्मीर फाइल्स'मध्ये काहीही चुकीचे नाही, असे तुम्ही म्हणता. मग तुम्हाला असे का वाटते की काही लोक अजूनही चित्रपटावर शंका घेत आहेत? यावर उत्तरात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'कोण आहेत हे लोक?

जे 'द काश्मीर फाइल्स'च्या विरोधात आहेत, तिचं लोक आहेत जी कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात आहे, ती हिचं लोक आहेत जी नेहमी पाकिस्तानच्या बाजूने बोलतात. नेमके हेच लोक अप्रत्यक्षपणे दहशतवादाचे समर्थन करत आले आहेत. ते काश्मीरमधील दहशतवादाला वैचारिक कवच देत आहेत. हेच लोक तुकडे तुकडे टोळीच्या पाठीशी उभे आहेत.

मग तुम्हाला कळले असेल या लोकांचे दहशतवादाच्या उद्योगाबद्दल सहानुभूती आणि समर्थन का आहे? मग ते 'द कश्मीर फाइल्स'च्या विरोधात का आहेत हे देखील तुम्हाला समजेल. कारण या चित्रपटाने पहिल्यांदाच दहशतवादाचा पर्दाफाश केला आहे. इतका अन्य कोणताही चित्रपट भारतात करू शकला नाही.'

विवेक अग्निहोत्रीने नुकतेच सांगितले की ते व्यावसायितक यशासाठी चित्रपट का बनवत नाही. यासोबतच त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर' बनवल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नसल्याचा त्यांनी खुलासा केला. ते म्हणाला, 'माझ्या मते, काश्मीर फाइल्स हे तुमच्यासाठी व्यावसायिक यश आहे, कदाचित झीसाठी, ज्यांनी प्रत्यक्षात पैसे कमवले आहेत.

मी लाभार्थ्यांपैकी एक आहे, पण मुख्य लाभार्थी नाही. ते झीचे प्रॉडक्ट होते. मी जे काही पैसे कमावले ते मी माझ्या पुढच्या चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये गुंतवले आणि मी नेहमीप्रमाणे कंगाल झालो. पल्लवी आणि मी चर्चा करत होतो की आम्ही पुन्हा विस्कळीत झालो आहोत, आता आम्हाला आमचा पुढचा चित्रपट करण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com