Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला कांदा पोहे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कांदा पोहे खाल्ल्याने संपूर्ण दिवसभर शरीराला उर्जा मिळते.
अनेक महिलांचे घरी कांदा पोहे मऊ आणि सुटसुटीत होत नाही तर आज आम्ही कांदा पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
कांदा पोहे बनवण्यासाठी जाड पोहे, कांदा, बटाटा, शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी व जिरे, हळद, मीठ, तेल, लिंबू, साखर हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी पोहे एका चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवा. नंतर पोह्यांना मीठ, हळद आणि साखर मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये शेंगदाणे कुरकुरीत भाजा नंतर बटाट्याच्या बारीक केलेल्या फोडी तेलामध्ये फ्राय करा.
नंतर या तेलामध्ये मोहरी आणि जिरे याची फोडणी द्या त्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाका. तयार मिश्रणात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
आता या मिश्रणात पोहे, शेंगदाणे आणि बटाटा मिक्स करा आणि व्यवस्थित परतून घ्या. कढईवर झाकण ठेवून पोहे चांगले शिजवून घ्या.
तयार कांदा पोहे मध्ये कोथिंबीर आणि लिंबू मिक्स करून सर्व्ह करा.