Kirron Kher Birthday Instaggram @kirronkhermp
मनोरंजन बातम्या

Kirron Kher Birthday : संकटांनी पाठ सोडली नाही, तरीही नेहमी चेहऱ्यावर हास्य; 'किरण खेर'चा अंगावर काटे आणणारा प्रवास, एकदा वाचाच

Kirron Kher Struggle Story : कायमच सर्वांसोबत खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या किरण खेर यांचा आज वाढदिवस आहे. किरण खेर यांचा जन्म १४ जून १९५२ रोजी झाला.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांनी नाटक आणि चित्रपट क्षेत्राला विशेष योगदान दिले आहे. त्यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाची मोहर चाहत्यांमध्ये उमटवली आहे. कायमच सर्वांसोबत खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या किरण खेर यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री किरण खेर आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. मूळची पंजाब शीख कुटुंबातील किरण खेर यांचा जन्म १४ जून १९५२ रोजी बंगळुरूतील म्हैसूरमध्ये झाला.

किरण खेर यांचं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण झालेले आहे. किरण आज एक यशस्वी अभिनेत्री असून त्या बॅडमिंटन खेळातही माहीर आहेत. किरण खेर यांनी अनेक ठिकाणी बॅडमिंटन खेळल्या आहेत. दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबत किरण खेर राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळल्या आहेत. पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किरणचा अभिनयाकडे कल वाढला. तिने याच दिशेने करिअर करण्याचा विचार केला. किरणने चंदीगडमध्ये नाटकामध्ये प्रवेश केला.

नाटकानंतर, किरण खेर यांनी १९७३ पासून 'असर प्यार दा' या पंजाबी चित्रपटातून सिनेकरिअरची सुरुवात केली. सुनील दत्त यांच्या एका चित्रपटामध्ये किरण खेर यांनी काम केले. पण त्यांचा तो चित्रपट रिलीजच झाला नाही. आर्थिक संकटामुळे चित्रपटाची शुटिंग पूर्ण शकली नाही. १९८० मध्ये किरण चंदीगढहून मुंबईत आल्यानंतर त्यांना अनेक चित्रपटाची संधी मिळाली. त्यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि काही रिॲलिटी शोमध्येही काम केले आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

अनुपम खेर आणि किरण खेर या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. पण दोघांनीही आपल्या लाईफ पार्टनरला घटस्फोट देत नवीन आयुष्याला सुरुवात दिली. दोघांचीही ओळख नाटकातील आहे. जेव्हा किरण मुंबईमध्ये आल्या होत्या, तेव्हाची दोघांची ही मैत्री होती. किरण आणि अनुपम यांची भेट कोलकात्यामध्ये झाली होती. दोघांचीही आधी मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या भेटीमध्ये त्यांना एकमेकांविषयी प्रेम जाणवले. त्यानंतर दोघांनी आपल्या आपल्या जोडीदाराला घटस्फोट दिला आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली.

किरण खेर ह्यांनी चंदीगढमधून २०१४ची लोकसभा निवडणुक जिंकल्या होत्या. त्यांनी आपल्या करियरमध्ये फक्त सिनेविश्वातच नाही तर, अनेक सामाजिक कार्यात अग्रगण्य काम केले आहे. किरण खेर यांनी स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'लाडली' मोहिम, कॅन्सरविरोधातील 'रोको कॅन्सर' मोहिमेमध्ये मुख्य भूमिका बजावली. महत्त्वाचं म्हणजे किरण खेर यांनी कॅन्सरवर मात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT