Deepika Padukone Bday: दीपिका पदुकोण मॉडेलपासून अशी बनली बॉलिवूडची टॉप अभिनेत्री, आज आहे इतक्या कोटींची मालकीण

Deepika Padukone Net Worth: दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त (Deepika Padukone Bday) आज आपण तिच्या फिल्मी करिअर, मॉडेलपासून ते बॉलिवूडच टॉप अभिनेत्री हा प्रवास आणि नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत...
Deepika Padukone
Deepika PadukoneSaam Tv
Published On

Deepika Padukone Birthday:

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिका पादुकोणला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर दिपीकाने बॉलिवूड इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'ओम शांती ओम'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या दीपिकाने पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले. दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त (Deepika Padukone Bday) आज आपण तिच्या फिल्मी करिअर, मॉडेलपासून ते बॉलिवूडच टॉप अभिनेत्री हा प्रवास आणि नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत...

मॉडेलिंगसाठी सोडलं शिक्षण -

दीपिका पदुकोणचा जन्म 5 जानेवारी 1986 ला डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे झाला. तिचे वडील प्रकाश पदुकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होते. तर तिची आई उज्ज्वला पदुकोण ट्रॅव्हल एजंट होती. दीपिकाने ९ व्या वर्षी मॉडेलिंग करून आपल्या करिअरची सुरुवात केली. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी दीपिकाने तिचे शिक्षणही सोडले होते. मॉडेलिंगमध्ये यश मिळवल्यानंतर दीपिकाने अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केले. दीपिकाने 2007 मध्ये फराह खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

किंग खानसोबत डेब्यू -

दीपिका पदुकोणने पहिल्याच चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानसोबत काम केले. ही तिच्यासाठी खूपच मोठी संधी होती. या चित्रपटाने दीपिकाला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'ओम शांती ओम' व्यतिरिक्त दीपिकाने 'पठान', 'जवान', 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

500 कोटींची मालकीण -

दीपिका पदुकोण फक्त चित्रपटांमधून कमाई करत नाही. तर ती चित्रपट निर्मिती, ब्रँड एंडोर्समेंटसह अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करते. अभिनेत्रीने तिच्या चित्रपट निर्मितीमध्ये रणवीर सिंग स्टारर स्पोर्ट्स ड्रामा फिल्म '83' आणि स्वतःचा 'छपाक' चित्रपट तयार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये इतकी आहे.

Deepika Padukone
Shivrayancha Chava Film Create History In Marathi Cinema: दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ने प्रदर्शनाआधीच रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला मराठी चित्रपट

महागड्या कारची आवड -

दीपिका पदुकोण लक्झरी लाइफ जगते. तिच्याकडे आलिशान घर, महागडी घड्याळे आणि आलिशान कारचा खूपच अप्रतिम संग्रह आहे. अभिनेत्रीकडे मर्सिडीज मेबॅक 500 ही कार आहे. जी भारतातील सर्वात महागड्या वाहनांपैकी एक आहे. तसंच, दीपिकाच्या कार कलेक्शनमध्ये Audi A8L, Mini Cooper Convertible आणि Audi Q7 या महागड्या कार आहेत. एवढेच नाही तर तिच्याकडे महागडी घड्याळेही आहेत. दीपिका पदुकोणचे ब्युमोंडे टॉवर्समध्ये आलिशान घर आहे. हे 4 BHK अपार्टमेंट 2776 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. दीपिकाच्या या घराची किंमत 16 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Deepika Padukone
Sarita Mehendale: 'भागो मोहन प्यारे' फेम अभिनेत्रीला पुत्ररत्न , नववर्षाच्या पहिल्याच दिवशीच केलं बाळाचं स्वागत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com