Sarita Mehendale: 'भागो मोहन प्यारे' फेम अभिनेत्रीला पुत्ररत्न , नववर्षाच्या पहिल्याच दिवशीच केलं बाळाचं स्वागत

Sarita Mehendale Blessed With Baby Boy: अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सरिताच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Sarita Mehendale Blessed With Baby Boy
Sarita Mehendale Blessed With Baby BoySaam Tv
Published On

Bhago Mohan Pyare Serial:

'भागो मोहन प्यारे' (Bhago Mohan Pyare) या मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री सरिता मेहेंदळेच्या (Actress Sarita Mehendale) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सरिताला पुत्ररत्न झाले असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने बाळाचे स्वागत केले आहे. १ जानेवारी २०२४ ला सरिताने गोंडस मुलाला जन्म दिला. घरामध्ये नव्या पाहुणा आल्यामुळे सरिताच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सरिताच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सरिता मेहेंदळेने नुकताच आई झाली असल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. तिने 'इट्स आ बॉय' असे लिहिलेले लहान मुलाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे नवीन वर्ष भरभरून आनंद घेऊन आले आहे !! 01.01.2024 ला छोट्याचं स्वागत आहे.' यासोबतच तिने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सरिताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह काही सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिया खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सरिता मेहेंदळेने नोव्हेंबर महिन्यामध्ये आई होणार असल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. सरिताच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. सरिताने पती सौरभ जोशीसोबत डोहाळे जेवणाचे खास फोटोशूट केले होते. हे फोटो शेअर करत तिने 'कुणीतरी येणार येणार गं' हा हॅशटॅग टाकला होता. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी या पोस्टला पसंती देत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान, सरिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण 'भागो मोहन प्यारे'या मालिकेतील मधुवंती या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. या मालितून ती घराघरामध्ये पोहचली. सरिताने 'सरस्वती' या मालिकेतून आपल्या मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.

Sarita Mehendale Blessed With Baby Boy
Deepika Padukone Bday: दीपिका पदुकोण मॉडेलपासून अशी बनली बॉलिवूडची टॉप अभिनेत्री, आज आहे इतक्या कोटींची मालकीण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com