Heart Attack Death Video: कोरोना संसर्गानंतर देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कधी लग्नात नाचताना, कधी खेळताना, तर कधी रस्त्यावरून जात असताना अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेशच्या नोयडा शहरातून समोर आला आहे.(Latest Marathi News)
नोयडा येथील एका स्टेडियमवर बॅडमिंटन खेळताना शनिवारी एका ५२ वर्षीय व्यक्तीच्या अचानक छातीत कळ (Heart Attack) आली. उपस्थित असलेल्या मित्रांना काही कळण्याच्या आतच तो खाली पडला. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या १० सेकंदातच या व्यक्तीचा मृत्यू झाला.
थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेंद्र शर्मा (वय ५२ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. महेंद्र हे नोएडा शहरातील सेक्टर २६ परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती आहे.
महेंद्र शर्मा हे नियमितपणे बॅडमिंटन खेळण्यासाठी नोयडा स्टेडियमवर (Uttar Pradesh) येत होते. शनिवारी स्टेडियमवर आल्यानंतर त्यांनी बॅटमिंटन खेळण्यास सुरूवात केली. मात्र, अचानक छातीत कळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी त्यांना सीपीआर दिला.
मात्र, तरीही महेंद्र हे कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने मित्रांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. महेंद्र यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनंतर मृत महेंद्र शर्मा यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.