Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भयानक अपघात; सोन्यासारख्या लेकराचा गेला जीव, ५ जण गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg Accident: या भीषण अपघातात कारमधील एक वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले.
Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident NewsSaam TV

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांचं सत्र सुरुच आहे. शनिवारी (१० जून) पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हज यात्रेसाठी मुंबई येथून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात निघालेल्या कारचा वैजापूरजवळ अचानक टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन उलटली.

या भीषण अपघातात कारमधील एक वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथामिक उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी येवला येथे पाठवण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident: मोठी बातमी! 'समृद्धी' महामार्गावर भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू

अख्तर रझा असं मृत्युमुखी पडलेल्या एक वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. तर आझाद अली खान (वय ४९), अफताब अली (वय २४), खुशबू आलम खान (वय २६), यास्मिन खान (वय १८), सोहेल आलम खान (वय ३०) सर्व राहणार वाशी, मुंबई हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, अपघातग्रस्त (Accident News) कुटुंब हे मूळ बिहार राज्यातील छप्रा येथील रहिवासी असून सध्या ते मुंबईतील वाशी परिसरात राहत होते. गया येथून १७ जुन रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी ते आपल्या गावी छप्रा येथे जात होते.

Samruddhi Mahamarg Accident News
Monsoon Update: गुड न्यूज! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार; बिपरजॉयचा धोका टळला? वाचा IMDचा अंदाज

दरम्यान, समृद्धी महामार्गावरुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असतांना जांबरगाव व लासूरगांव दरम्यान त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच वैजापूर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हज यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com