Monsoon Update: गुड न्यूज! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार; बिपरजॉयचा धोका टळला? वाचा IMDचा अंदाज

Maharashtra Monsoon Update: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon UpdateSaam TV
Published On

Maharashtra Monsoon Update: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ईशान्येकडील बहुतेक राज्ये व्यापून मान्सूनने शनिवारी कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर गुरूवारी मान्सूनने देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली.

Maharashtra Monsoon Update
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, पश्चिम रेल्वेवर तब्बल १४ तासांचा मेगाब्लॉक, रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

शनिवारी (१० जून) मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात धडक दिली. (Breaking Marathi News)

सध्या मान्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. कर्नाटकमध्ये आलेला मान्सून पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका कायम

एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपला असताना, दुसरीकडे  ‘बिपरजॉय’ (Cyclone) चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. येत्या २४ तासांत बिफरजॉय चक्रीवादळ रौद्ररुप धारण करणार असल्याची शक्यता आहे. याचा कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो, मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

Maharashtra Monsoon Update
Maharashtra Politics: आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर आहे. आगामी २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागाला सतर्कतेचा (Rain Alert)  इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्यामुळे मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com