Maharashtra Politics: आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Shirsat on Anand Dighe: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
Investigate the death of Anand Dighe Eknath Shinde Group Mla Sanjay Shirsat demand Maharashtra Politics
Investigate the death of Anand Dighe Eknath Shinde Group Mla Sanjay Shirsat demand Maharashtra Politics Saam TV

Sanjay Shirsat on Anand Dighe: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा अनेकांना संशय आहे. असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.  (Latest Marathi News)

Investigate the death of Anand Dighe Eknath Shinde Group Mla Sanjay Shirsat demand Maharashtra Politics
Nitish Rane on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं धर्मांतर झालंय, लव्ह जिहाद झालाय; नितेश राणेंची जीभ घसरली

"आनंद दिघे यांना ठाण्यातील प्रत्येक घरात दैवत मानलं जातं. माझी मागणी हीच आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांची मृत्यूची चौकशी करावी, ठाण्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनात सुद्धा हेच आहे", असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, अनेकांचं असं मत आहे की, आनंद दिघे साहेबांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आला आहे. ज्या आनंद दिघे साहेबांना एका दिवसानंतर डिस्चार्ज मिळणार होता. त्यादिवशी काय घडलं ज्यामुळे आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला, हे समोर आलं पाहिजे असं देखील संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

Investigate the death of Anand Dighe Eknath Shinde Group Mla Sanjay Shirsat demand Maharashtra Politics
Sanjay Raut News: शिवसेना फुटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी नव्हे तर..."

आनंद दिघे साहेब यांची आठवण आजही ठाणेकरांच्या मनात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब हे दिघे साहेबांचे कट्टर शिवसैनिक आहे म्हणून दिघे साहेबांचा आश्रम सुसज्ज असा केलेला आहे. जे दिघे साहेबांच्या अंत्यविधीला नव्हते, ते देखील आज त्या आश्रमात जाऊन डोकं टेकवतात, प्रॉपर्टी बळकावणं हा तुमचा धंदा असेल, अशी टीका देखील संजय शिरसाट यांनी केली आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या मृत्यूची मागणी केल्याने त्यांना या प्रकरणात नेमकं कुणावर बोट ठेवायचं आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता संजय शिरसाट यांच्या या मागणीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे बघणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com