चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या निकालांना रद्द करत आम आदमी पार्टीचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी रिटर्निंग ऑफिसरने अमान्य घोषित केलेल्या सर्व ८ मतांना मान्य करण्याचे निर्देश दिलेत. या सर्व मतांच्या बॅलेट पेपरवर रिटर्निंग ऑफिसरने क्रास लावला होता.(Latest News)
आम आदमी पक्षाचे (आप) नगरसेवक कुलदीप कुमार यांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरच्या ८ मते अवैध ठरविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर झाली.
या खटल्याची सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश म्हणाले, सर्व ८ मते याचिकाकर्ते उमेदवार कुलदीप कुमार यांच्या बाजूने आहेत. रिटर्निंग ऑफिसरने त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. सोमवारी प्रश्न विचारण्यापूर्वी आम्ही अनिल मसिह यांना गंभीर परिणाम भोगावे लागण्याचा इशाराही दिला होता. रिटर्निंग ऑफिसरने ८ बॅलेट पेपरवर आपली खूण केली. अधिकाऱ्याने त्याच्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन काम केले. रिटर्निंग ऑफिसरने गुन्हा केलाय, यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.
सोमवारी रिटर्निंग ऑफिसरने मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर कबुली दिली होती की त्यांनीच बॅलेट पेपरवर क्रॉस टाकले होते. रिटर्निंग ऑफिसरची चौकशी केल्यानंतर कोर्ट रूममध्ये निवडणुकीशी संबंधित सर्व मूळ व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि कागदपत्रे मागवण्यात आले होते. रिटर्निंग ऑफिसरचा व्हिडिओ आणि बॅलेट पेपरही कोर्ट रूममध्ये जमा करण्यात आले होते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलदीप कुमार काय म्हणाले
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलदीप कुमार म्हणाले की, मला न्यायालयाचे आभार मानायचे आहेत. काही काळासाठी सत्याला त्रास दिला जाऊ शकतो, परंतु त्याला दाबले जाऊ शकत नाही. सत्याचा नेहमी विजय होतो. चंदीगडमध्ये रखडलेली विकासकामे मी आधी पूर्ण करेल. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीचा खून होऊ दिला नाही. आगामी काळात चंदीगडमध्येही आमचे खासदारही विजयी होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.