Naal 2 Film Instagram
मनोरंजन बातम्या

Naal 2 Film: ‘नाळ २’ला 'फिल्मफेअर मराठी २०२४'मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित, जितेंद्र जोशीची पोस्ट चर्चेत

Chetan Bodke

Naal 2 Film

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘नाळ’च्या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी ‘नाळ २’ रिलीज केला. ‘नाळ २’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. नुकतंच फिल्म इंडस्ट्रीमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. 'फिल्मफेअर मराठी २०२४' या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. अशातच ‘नाळ २’ चित्रपटालाही अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. चित्रपटाला अनेक पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर, अभिनेता जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने पुरस्काराबद्दल लिहिले आहे.

नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ चित्रपटाला 'फिल्मफेअर मराठी २०२४' पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकारने सन्मानित करण्यात आले. जितेंद्र जोशीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, "नुकताच ‘नाळ’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच विभागात माझा जुना मित्र संदीप पाठक सुद्धा "श्यामची आई" या त्याच्या चित्रपटासाठी मानांकित होता त्याच्या सोबत हा पुरस्कार वाटून घेतला."

" ‘नाळ’ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) पुरस्कार मिळाले. माझे घनिष्ट मित्र नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांनी मला ही भूमिका दिली आणि माझे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी प्रेमाने ती करवून घेतली. त्यांच्यातील शांतता घेऊन मी फक्त वावरलो आणि जे घडलं त्याला प्रेम मिळतंय. फिल्मफेअर आणि जितेश पिल्लई सर तुमच्या प्रेमासाठी आभारी आहे. अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर तुम्ही नेहमीप्रमाणे कमाल सूत्रसंचालन केलं." अशी त्याने आपली इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली. (Marathi Film)

‘नाळ’ चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सुधाकर रेड्डी यंक्कटी यांना तर, सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ ला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी झी ५ (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी हे कलाकार आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT