Rinku Rajguru Trolled: "आर्चे, काय कपडे घातलेस ?"; ड्रेसिंगमुळे रिंकू राजगुरू ट्रोल

Filmfare Marathi 2024 Awards: 'सैराट' चित्रपटातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी रिंकू राजगुरू 'फिल्मफेअर मराठी २०२४' मधील लूकमुळे चर्चेत आली आहे. या लूकमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल होत आहे.
Rinku Rajguru Trolled
Rinku Rajguru TrolledSaam Tv

Rinku Rajguru Trolled

मराठी कलाविश्वात मानाचा समजला जाणारा 'फिल्मफेअर मराठी २०२४ पुरस्कार सोहळा' नुकताच पार पडला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. 'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आर्चीच्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. आर्ची अर्थात रिंकू राजगुरू नव्या लूकमुळे तुफान ट्रोल झाली आहे. तिने पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत रेड कार्पेटवर सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या ह्या वेस्टर्न आऊटफिट लूकने रिंकू तुफान ट्रोल होत आहे.

Rinku Rajguru Trolled
Do Aur Do Pyaar आणि LSD 2 ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरूवात, पहिल्या दिवशी केली तुटपुंजी कमाई

रिंकूने फिल्मफेअर अवॉर्डमध्ये घातलेल्या डिप लेक गाऊनमुळे चर्चेत आली आहे. अनेकांनी तिच्या ह्या लूकचे कौतुक केले असून तिला ट्रोलिंग करीत आहेत. रिंकू 'सैराट' चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटाने तिला फार मोठी प्रसिद्धी दिली आहे. साध्या सिंपल आणि निरागस सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या रिंकूचा हा हटके वेस्टर्न लूक पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्या राजश्री मराठी या इन्स्टाग्राम चॅनलवर तिचा रेड कार्पेटवरील लूक तुफान व्हायरल होत असून अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

"जिथं कला संपते तिथे 'प्रदर्शन' सुरु होत...", "हिला पण लवकरच हवा लागली", "काय कपडे घातले अगं आर्चे, जरा जीवाला लाज", "लाज शरम सर्व घालवली आहे, एक सैराट काय हिट झाला तर हवेतच गेली", "तु साधी सिंपलच छान दिसतेस" असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केले आहे. तर अनेकांनी तिच्या लूकचे कौतुक केले असून तिच्या अभिनयाचेही कौतुक केले. रिंकूचा हा रेड कार्पेटवरील लूक तुफान व्हायरल होत असून लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Social Media)

Rinku Rajguru Trolled
Salman Khan Video: गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला सलमान खान, दुबईसाठी रवाना

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, रिंकूने 'सैराट' चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. तिने 'झुंड' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. तिच्यासोबत चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बिग बीही होते. तर सोबतच अभिनेत्रीने झिम्मा २, कागर, आठवा रंग प्रेमाचा सह अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. (Entertainment News)

Rinku Rajguru Trolled
Amruta Khanvilkar: 'माझ्या हृदयाचे दोन तुकडे...'; सोनाली आणि सनायाच्या 'मायलेक' चित्रपटासाठी अमृताची भावनिक पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com