Filmfare Marathi 2024 Winner: 'फिल्मफेअर मराठी' पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाने मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी

Filmfare Marathi 2024 Winner List: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोतकृष्ट पुरस्कार सोहळा 'फिल्मफेअर मराठी 2024' नुकताच पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटांना, कलाकारांना गौरवण्यात आले आहे. या सोहळ्यात कोणत्या चित्रपटाने बाजी मारली आहे जाणून घ्या.
Filmfare marathi 2024 award winners list
Filmfare marathi 2024 award winners listSaam Tv

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोतकृष्ट पुरस्कार सोहळा 'फिल्मफेअर मराठी 2024' नुकताच पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटांना, कलाकारांना गौरवण्यात आले आहे. मागील वर्षी मराठी चित्रपटसृष्टीत खूप चांगले चित्रपट प्रदर्शित झाले होते. प्रेक्षकांनी या चित्रपटांना खूप जास्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे यंदाच्या फिल्मफेअरमध्ये कोणता चित्रपट बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

फिल्मफेअर मराठी २०२४ या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेक कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. मराठी फिल्मफेअर २०२४ हा पुरस्कार सोहळा १८ एप्रिलला पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित आत्मपॅम्प्लेट आणि केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चित्रपटाने बाजी मारली आहे.

Filmfare marathi 2024 award winners list
Article 370: 'आर्टिकल ३७०' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?

फिल्मफेअर मराठी २०२४ चे विजेते

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट- आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा

 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आशिष बेंडे (आत्मपॅम्पलेट)

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट (Critics)- बापल्योक, नाळ २

 • सर्वोत्कृष्ट अभिनेता- शशांक शेंडे

 • सर्वोत्कृष्ट अभिनेता (Critics)- अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर)

 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- गौरी देशपांडे (श्यामची आई)

 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Critics)- रोहिणी हटंगडी (बाईपण भारी देवा)

 • सर्वोत्कृष्ट सहकलाकार (पुरुष)- जितेंद्र जोशी, विठ्ठल नागनाथ काळे

 • सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री)- अनिता दाते, निर्मिती सावंत

 • सर्वोत्कृष्ट गीत- गुरु ठाकूर (क्षण कालचे)

 • सर्वोत्कृष्ट अल्बम- महाराष्ट्र शाहीर (अजय अतुल)

 • सर्वात्कृष्ट पार्श्वगायक- जयेश खरे, मयुर सुकाळे (महाराष्ट्र शाहीर)

 • सर्वोत्कृष्ट गायिका- नंदिनी श्रीकर (उनाड)

'फिल्मफेअर मराठी २०२४' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघने केले आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी, मृण्मयी देशपांजे, वैभव तत्ववादी या कलाकारांनी सुंदर सादरीकरण केले.

Filmfare marathi 2024 award winners list
Divyanka Tripathi: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा मोठा अपघात; गंभीर जखमी, हाताची दोन हाडे तुटली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com