Divyanka Tripathi: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा मोठा अपघात; गंभीर जखमी, हाताची दोन हाडे तुटली

Divyanka Tripathi Accident: हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांका त्रिपाठीचा नुकताच अपघात झाला आहे. दिव्यांकाचा नवरा विवेकने याबाबत सोशल मीडियावरुन माहीती दिली आहे.
Divyanka Tripathi Accident
Divyanka Tripathi AccidentSaam Tv

हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांका त्रिपाठीचा नुकताच अपघात झाला आहे. दिव्यांकाचा नवरा विवेकने याबाबत सोशल मीडियावरुन माहीती दिली आहे.

दिव्यांका त्रिपाठीचा हा अपघात खूप जास्त मोठा असल्याचे समजत आहे. त्यामुळे दिव्यांका आणि विवेक पुढील काही दिवस काम करणार नसल्याचेही विवेकने सांगितले आहे. दिव्यांकाचा अपघात कसा झाला, याबाबत विवेकने माहिती दिली आहे. (Divyanka Tripathi Accident)

विवेकने पोस्टमध्ये लिहले आहे की, 'आम्हाला हे सांगायला खूप जास्त दुः ख होत आहे की, उद्याचे लाइव्ह सेशन पोस्टपोन करण्यात आले आहे. काही तासांपूर्वी दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे. तिच्यासध्या उपचार सुरु आहे. विवेक तिची काळजी घेत आहे. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. दिव्यांका लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा. आम्ही तुमच्याशी लवकरत संवाद साधू'.

विवेकने इन्स्ट्राग्रामवर अजून एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात त्याने दिव्यांकाच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. 'दिव्यांका मॅडमच्या हाताची दोन हाडे तुटली आहेत. उद्या त्यांची सर्जरी होणार आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे', असं त्याने म्हटलं आहे.

Divyanka Tripathi Accident
Julun Yeti Reshimgathi: 'जुळून येती रेशीमगाठी' फेम 'आदित्य' अडकला लग्नबंधनात; कलाकारांनी लावली लग्नाला हजेरी

दिव्यांकाचा अपघात कुठे झाला, कधी झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दिव्यांकाच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. चाहते दिव्यांकाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहे.

काही महिन्यांपूर्वीच दिव्यांकाची लिगामेंट सर्जरी झाली होती. याबाबत माहिती तिने सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर आता तिचा अपघात झाल्याने चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

Divyanka Tripathi Accident
Shreyas Talpade: १४ डिसेंबरच्या रात्रीनंतर सर्वकाही बदललं...; श्रेयसनं सांगितलं हृदयविकाराच्या झटक्यानंतरच आयुष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com