अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजलेला आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट नुकताच ६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. वेगळे कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुफान चर्चा होत आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्याने स्वत:ला या चित्रपटाचं कौतुक करण्यापासून रोखू शकलेले नाही. चित्रपटाला म्हणाव्या तशा स्क्रिनिंग उपलब्ध नसल्याने अनेकांना चित्रपट पाहायचा असूनही ते शक्य झाले नाही. नुकतंच दिग्दर्शकाने चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल भाष्य केलं आहे.
परेश मोकाशी लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाची कथा शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि मित्रांमधील स्पर्धा यावर चित्रपटामध्ये भाष्य केलेय. अनेकांकडून या चित्रपटाचे कौतुक होत असले तरी, चित्रपटाला म्हणावा तसा खास प्रतिसाद मिळत नाही. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केले असले तरी, हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच कमी प्रेक्षक वर्ग दिसत आहे.
अशातच ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकांनी प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये दिग्दर्शकाने लिहिले की, “विकडेजला भरघोस प्रतिसाद मिळू शकेल असे शोज मिळाले आहेत. असो, जोक्स अपार्ट, यामध्ये थिएटर्स किंवा प्रेक्षकांचा काहीच दोष नाही. अगदी 1000%. आम्हीच सगळे प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायला कमी पडलो. शेवटी मराठी सिनेमा आणि त्याचं मार्केटिंग आणि पब्लिसिटीचं एक बजेट ठरलेलं असतं. त्या अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत.”
दिग्दर्शक पोस्टच्या शेवटच्या भागात सांगतात, “तर ज्या ज्या प्रेक्षकांना हा सिनेमा बघायची इच्छा असेल, त्यांनी बुधवारच्या आत हा सिनेमा बघावा असं मी आवाहन करतो. कारण गुरुवार किंवा शुक्रवारी सिनेमा उतरेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे विकेंडपर्यंत थांबून मग बघुयात असा विचार करत असाल तर कदाचित भ्रमनिरास होऊ शकतो. बाकी ज्या ज्या प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे, प्रेम दिलं आहे त्यांचे मनःपूर्वक आभार भावांनो!!!” दिग्दर्शकाच्या या पोस्टवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा चित्रपटाचे कौतुक केलं आहे. तर अनेका युजर्स ‘आम्ही हा चित्रपट पाहू’ असं म्हणाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.