मराठी सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' म्हणून स्वप्नील जोशीची ओळख. त्यासोबतच स्वप्नीलला छोट्या पडद्यावरील कान्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते. बहुआयामी अभिनेता म्हणून कायमच चर्चेत राहिलेल्या स्वप्नील जोशीचा आज वाढदिवस ४६ वा वाढदिवस. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांना भुरळ घालण्यासोबत त्याने मराठी-हिंदी सिरियल, चित्रपट आणि वेबसीरीज अशा सर्वच माध्यमांमध्ये त्याने काम केलं आहे.
वयाच्या नवव्या वर्षी स्वप्नील जोशीने रामानंद सागरच्या 'उत्तर रामायण' या मालिकेतून रामचा मुलगा कुशचे पात्र साकारत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तर नंतर स्वप्नीलने रामानंद सागर यांच्याच 'श्री क्रिष्णा' या मालिकेतून कृष्णाचे पात्र साकारले होते. कृष्णाचे पात्र साकारल्यानंतर त्याच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली. त्या भूमिकेनंतर स्वप्नीलची ओळख केवळ राज्यातच नाही तर, देशभरात झाली. इतक्या लहान वयातील त्याच्या सहज सुंदर अभिनयाने सगळ्यांचे मनं जिंकले. (Serial)
या मालिकेने स्वप्नीलला प्रचंड लोकप्रियता मिळून दिली. नेहमीच आपल्या वैविध्यकामामुळे चर्चेत राहणाऱ्या स्वप्नील जोशीची एक विनोदी नट म्हणूनही ओळख आहे. दरम्यान, त्याने आपल्या सिनेकारकिर्दित अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आपल्या फिल्मी कारकिर्दित 'दुनियादारी', 'मुंबई-पुणे-मुंबई', 'मंगलाष्टक वन्समोअर', 'चेकमेट', 'वेलकम जिंदगी', 'भिकारी' सह इत्यादी चित्रपट त्याने आपल्या चाहत्यांना दिले आहेत. तर 'श्रीकृष्ण', 'रामायण', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' अशा लोकप्रिय मालिकांमधून स्वप्नीलने काम केलं आहे. सध्या 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून त्याने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले असून सध्या 'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून तो चाहत्यांचे निखळ मनोरंजन करतोय.
एकंदरीतच स्वप्नील जोशीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्याने आपल्या रियल लाईफमध्ये दोन लग्न केली आहेत. कॉलेजला जात असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. तिचं नाव अपर्णा असं असून त्यांनी पुढे लग्नही करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर चार वर्ष एकत्र संसार केल्यानंतर २००९ मध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे मग स्वप्नीलने औरंगाबदमधील एका मुलीसोबत लग्न केलं. स्वप्नीलने आणि लीनाने २०११ मध्ये लगीनगाठ बांधली असून त्यांना मायरा आणि राघव अशी दोन मुलं आहेत. (Entertainment News)
स्वप्नील जोशीचा गेल्या काही दिवसांपूर्वी परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्यानंतर तो लवकरच आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटामध्ये प्रसाद ओक सुद्धा मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे नाव 'जिलेबी' असे आहे. सध्या प्रेक्षकांना स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाची तुफान उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.