Zindagi Na Milegi Dobara Sequel: 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिक्वेल येणार? फरहान अख्तरच्या पोस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

Farhan Akhtar Post: फरहान अख्तरने शेअर केला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटातील त्याचा फोटो.
Zindagi Na Milegi Dobara Sequel
Zindagi Na Milegi Dobara SequelSaam TV
Published On

Farhan Akhtar Posted His Photo From ZNMD:

हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन यांचा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट अनेकांचा आवडता चित्रपट असेल. या चित्रपटाने अनेकांना नव्याने आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाला रिलीज होऊन १२ वर्षे झाली आहेत. या चित्रपटामध्ये ३ मित्रांचे आयुष्य खूप सुंदररित्या दाखविण्यात आले आहे. १२ वर्षांपूर्वीचा हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने बघतात. आता पुन्हा या चित्रपटाची चर्चा आहे.

फरहान अख्तरने ही पोस्ट शेअर करताच त्यावर चित्रपटातील इतर कलाकार म्हणजे हृतिक रोशन, अभय देओल आणि चित्रपटाची दिग्दर्शिका जोया अख्तरने कमेंट केल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभय देओलने कमेंट करत लिहिले आहे, 'मी माझी बॅगवती २०१२ पासूनच पॅक करून ठेवली आहे, तुम्ही का थांबला आहात? 'माझी बॅगवती देखील पॅक आहे', अशी कमेंट जोया अख्तरने केली आहे. 'लेस गो' असं म्हणत हृतिकने देखील त्याचा एक्ससाईटमेंट व्यक्त केली आहे.

फरहान अख्तरच्या या पोस्टवर नेटफ्लिक्सने देखील कमेंट केली आहे. प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य एक रोड ट्रिप प्लॅन करणं, अशी कमेंट नेटफ्लिक्सने केली आहे. या चित्रपटाचे चाहते देखील या चित्रपटाच्या पुढील भागासाठी खूप उत्सुक आहेत. आमहाला तेच कलाकार नवीन चित्रपटामध्ये हवे आहेत, हे खरं आहे का?, चित्रपटाचा दुसरा पार्ट येतोय? अशा अनेक कमेंट करत नेटकरी त्यांचा उत्साह व्यक्त करत आहेत.

Zindagi Na Milegi Dobara Sequel
National Film Award मध्ये साऊथचा डंका, अल्लू अर्जुन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; 'RRR'नं 6 अ‍ॅवॉर्डवर कोरलं नाव

१५ जुलै २०११ साली 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे एकूण बजेट ४५ कोटी होते. चित्रपट बहुतांश शूटिंग परदेशात झाले होते.

अनेक वर्षांनी तीन मित्र एका ट्रिपसाठी भेटले होते. या तिघांनी एकमेकांना न सांगता काहीतरी स्पेशल प्लॅनिंग एकमेकांसाठी केले होते. या त्याच्या ट्रिप दरम्यान या तिघांनी स्वतःला नव्याने जाणून घेतले. या चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि हृतिक रोशन या प्रवासादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर अभय देओल आणि कल्की यांचे लग्न ठरलेले असते.

सध्या हृतिक रोशन 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. 'फायटर' हा चित्रपट २५ जानेवारीला २०१४ ला प्रदर्शित होणार आहे. तर हृतिक रोषाचा 'वॉर २' हा चित्रपट देखील २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com