जलवाहिनी जोडणीचे काम सुरू होणार असल्याने पाणीपुरवठा राहणार बंद
१० मार्च ते ११ मार्च रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद
पी पूर्व विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
मयूर राणे, साम टीव्ही
मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईच्या गोरेगाव (पूर्व) दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील उड्डाणपुलाजवळ जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम होणार आहे. यामुळे मंगळवार १० मार्च सकाळी ९ ते बुधवार ११ मार्च सकाळी ९ दरम्यान काम होणार आहे. यासाठी ७५० मिमी व्यासाच्या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीची जोडणी केली जाणार आहे.
जलवाहिनीची जोडणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पी पूर्व आणि पी दक्षिण विभागातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. जलवाहिनीची जोडणी काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारे परिसर
पी पूर्व विभाग: शिवशाही प्रकल्प
पी पूर्व विभाग: श्रीकृष्ण नगर, इंदिरा गांधी संशोधन संस्था परिसर
पी दक्षिण विभाग: सॅटेलाईट टॉवर, संतोष नगर, माळी नगर, हबळे पाडा, उमरशेट पाडा, नगरमोडे पाडा, सुनील मैदान, फिल्म सिटी मार्गालगतचा परिसर
कमी दाबाने पाणीपुरवठा :
पी दक्षिण विभाग: मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग, आर्य भास्कर मार्ग
नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केलं आहे. कामानंतर काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून पिण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे. पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेने केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.