Best International Film: एसएस राजामौलींचा चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अॅक्शन अॅडव्हेंचर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह अनेक विभागांमध्ये या चित्रपटाला नामांकने मिळाली होती.
RRR Won Best International Film in 50th Saturn Awards
RRR Won Best International Film in 50th Saturn AwardsSaam Tv
Published On

50th Saturn Awards: एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर'ला 50 व्या सॅटर्न अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अॅक्शन अॅडव्हेंचर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह अनेक विभागांमध्ये या चित्रपटाला नामांकने मिळाली होती.

राजामौली यांना हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहता न आल्याने एक एव्ही दाखविण्यात आली ज्यामध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानले.

RRR Won Best International Film in 50th Saturn Awards
Latest Movie Release: दाक्षिणात्य चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर गरुडझेप कायम, बॉलिवूड चित्रपटांची कासवचाल

"मला खूप आनंद झाला आहे की आमच्या 'आरआरआर' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात 'सॅटर्न अवॉर्ड' जिंकला आहे. मी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने ज्युरींचे आभार मानतो. आम्हाला खूप आनंद झाला आहे. हा माझा दुसरा 'सॅटर्न अवॉर्ड' आहे. 'बाहुबली: द कन्क्लूजन'साठी मला पहिला 'सॅटर्न अवॉर्ड' मिळाला होता. मला या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहायचे होते, परंतु जपानमधील आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशन संबंधित असलेल्या कमिटमेंटमुळे दुर्दैवाने मी उपस्थित राहू शकलो नाही. मी इतर सर्व विजेत्यांचे अभिनंदन करू इच्छितो. तसेच तुमचा वेळ खूप छान जावो अशी आशा करतो. मजा करा, नमस्ते," सॅटर्न अवॉर्ड्सच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक राजामौली यांनी म्हटले आहे.

अॅक्शन अॅडव्हेंचर विभागामध्ये, डेथ ऑन द नाईल, एफ 9: द फास्ट सागा, नो टाइम टू डाय, टॉप गन: मॅव्हरिक आणि वेस्ट साइड स्टोरी या चित्रपटांचा देखील समावेश होता. दरम्यान, डाउनटन अॅबे: अ न्यू एरा, आयफेल, आय ऍम युवर मॅन, रायडर्स ऑफ जस्टिस आणि सायलेंट नाईट सारख्या चित्रपटांसह सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत होते. (Award)

एसएस राजामौली यांच्यासह गुलेर्मो डेल टोरो (नाइटमेअर अ‍ॅली), जोसेफ कोसिंस्की (टॉप गन: मॅव्हरिक), जॉर्डन पीले (नोप), मॅट रीव्हस (द बॅटमॅन), स्टीव्हन स्पीलबर्ग (वेस्ट साइड स्टोरी), आणि जॉन वॅट्स (स्पायडर-मॅन: नो वे होम) हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या स्पर्धेत होते. (Movie)

'आरआरआर'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रु. 1000 कोटींची कमाई केली आहे. हे दोन स्वातंत्र्यसैनिक आणि मित्रांची ही कथा आहे - अल्लुरी सीताराम राजू (राम चरण यांनी भूमिका केली आहे) आणि ज्युनियर एनटीआर कोमाराम भीमच्या भूमिकेत आहे. दोघेही एका विशिष्ट कारणासाठी ब्रिटीशांच्या विरोधात एकत्र लढतात. चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त चित्रपटात श्रिया सरन, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com