Box Office Report: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भारतीय चित्रपटसृष्टीत चांगलेच दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांना चांगलेच बुचकळ्यात पाडले आहे. अक्षय कुमारचा 'रामसेतू' तर अजय देवगणचा 'थॅंक गॉड' चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले आहे. दुसऱ्याच दिवशी दोन्ही चित्रपटांना मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला आहे.
'राम सेतू' आणि 'थँक गॉड' या दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये चांगलीच लक्षणीय घट पाहायला मिळाली. इतकेच नाही तर 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटाच्या कमाईतही चांगलीच घट झाली आहे. चला तर एक नजर टाकुया चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनवर
Ram Setu: 'रामसेतू' चित्रपटाची बोट बुडताना दिसत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 15.25 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली. पहिल्या दिवसाची आकडेवारी लक्षात घेता, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 10.60 कोटी कमावले, चित्रपटाचे एकूण कलेक्शन 25.85 कोटी झाले आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्टीमुळे ही चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. (Bollywood Films)
Thank God: 'थॅंक गॉड' चित्रपटाच्या कमाईचा पारा चांगलाच घटला आहे. एकीकडे चित्रपटाने पहिल्याच दिवशी दहा टक्क्यांहून कमी कमाई केली होती तर दुस-या दिवशी चित्रपटाने केवळ 6 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 15.25 कोटींवर पोहोचली आहे.
Har Har Mahadev: शरद केळकर यांच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या कमाईतही घट झालेली दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास 1.20 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच दोन दिवसांत मराठी चित्रपटाने सुमारे 3.20 कोटींची कमाई केली आहे. (Marathi Films)
Kantara: या आठवड्यातील तिन्ही चित्रपटांच्या कमाईत घट झाली आहे. दुसरीकडे, ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा' या चित्रपटाच्या कलेक्शनवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. 26 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मंगळवारी 7.90 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याच वेळी, सुरुवातीची आकडेवारी पाहिली तर, चित्रपटाने बुधवारी देखील 7.90 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 192.70 कोटींवर पोहोचली आहे. (Tollywood)
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.