Netflix Release Movie: नेटफ्लिक्सवर होणार चित्रपटाचा रिमेक, सस्पेन्स आणि गुन्हेगारीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले

नीरज पांडेची नवीन वेब सीरिज 'खाकी: द बिहार चॅप्टर' ही एका सत्यकथेवर आधारित आहे. या वेबसीरिजची कथा नीरजच्या एका चित्रपटासारखीच आहे.
ott platform
ott platformSaam Tv
Published On

Latest Bollywood Movie: ओटीटीवर नेहमी वेगळा आशय प्रेक्षकांना पाहायला मिळतो. मंदीशी झुंज देणाऱ्या मनोरंजन विश्वात ओटीटी प्रेक्षकांना आवडणाऱ्या आशयाच्या शोधात आहे. एकेकाळी करोडोंमध्ये खेळल्या जाणार्‍या ओटीटी मालिकेचे भाग आता लाखोंच्या बजेटमध्ये पोहोचले आहेत.

मोठ्या पडद्यावर कोट्यावधींचे चित्रपट बनवणारा नीरज पांडे आता ओटीटीवर पुन्हा एकदा झळकणार आहे. वेबसीरिजची पार्श्वभूमी, सस्पेन्स आणि कमी बजेट सोबतच गुन्हेगारी मालिका घेऊन येत आहे. त्याने निवडलेली कथा ही बिहारमधील एका घटनेवर आधारित आहे.

ott platform
Salman Khan : सलमान खानच्या अपार्टमेंटमध्ये सापडल्या डेंग्यूच्या अळ्या; BMC ने केली औषध फवारणी

नीरज पांडेची नवीन वेब सीरिज 'खाकी: द बिहार चॅप्टर' ही एका सत्यकथेवर आधारित आहे. या वेबसीरिजची कथा नीरजच्या एका चित्रपटासारखीच आहे. या वेबसीरिजची कथा दोन पात्रांभोवती फिरणार आहे .

पहिले पात्र एक क्रूर जमिनदार आणि दुसरे पात्र भारतीय पोलिस सेवेतील एक पोलिस अधिकारी यांच्याभोवती वेबसीरिजची कथा फिरणार आहे. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ही सिरीज शूट करतानाचे बिहाईंड द सीन्स दिसत आहेत.

ott platform
Urfi Javed: उर्फीच्या क्रिएटिव्हिटीला तोडच नाही, व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या पुन्हा उठल्या नजरा !

या सिरीजमध्ये करण टैकर, अविनाश तिवारी, आशुतोष राणा, रवि किशन, अनूप सोनी, जतिन सरना, निकिता दत्ता, अभिमन्यु सिंह, ऐश्वर्य सुष्मिता, विनय पाठक या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या सिरीजचे काम सध्या सुरु असून लवकरच ही वेब सिरीज नेटफ्लक्सवरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ott platform
Samantha Ruth Prabhu Fees: समंथा प्रभूच्या मानधनात घसघशीत वाढ, रक्कम वाचून व्हाल थक्क

वेबसीरिजविषयी नीरज पांडे म्हणतात, मी पहिल्यांदाच नेटफ्लिक्ससोबत काम करणार आहे आणि या नवीन गोष्टीमुळे खूप उत्साही आहे. स्वत:ला नेटफ्लिक्सचाही चाहता मानतो. त्याच्या मनोरंजन आशयातील वैविध्यतेने त्याला नेटफ्लिक्सकडे आकर्षित केले. मालिकेची कथा ही एका नव्या शतकाची म्हणजे सुमारे २०-२२ वर्षांपूर्वीची आहे. या मालिकेचे शूटिंग बिहार आणि झारखंडमध्ये टाळेबंदीच्या काळात झाली आहे.

ott platform
Ritesh Deshmukh New Movie: वेडेपणा करायला मुहूर्त नसतो... रितेश देशमुखनं मुहूर्त साधला, 'वेड' लावणारा फर्स्ट लूक पाहा!

वेबसीरिजच्या आशयाबद्दल बोलायचे झाले तर, 'खाकी: द बिहार चॅप्टर' या वेबसीरिजची कथा एका निर्दयी गुन्हेगाराच्या उदयाची आणि एका समर्पित पोलीस अधिकाऱ्याच्या संघर्षाची गाथा आहे. पोलिस आधिकाऱ्यांना त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. बिहारच्या दृष्टीकोनातून नीरज पांडेने तयारी पूर्ण केली आहे. नीरज पांडेचा आशय नेटफ्लिक्स आपल्या व्यासपीठावर आणण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com