Salman Khan Dengue News: बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा नुकताच डेंग्यू आजारातून बरा झाला आहे. सलमानला (Salman Khan) डेंग्यू झाल्यानंतर बिग बॉसचं आणि त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटींग थांबवण्यात आलं होतं. सलमानला डेंग्यूची लागण का आणि कुठे झाली असावी याचं उत्तर आता मिळालं आहे. सलमान राहात असलेल्या मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Salman Khan Latest News)
सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट इमारतीत दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या (Dengue Larvae) सापडल्या आहेत. त्यानंतर बीएमसीच्या पथकाने औषध फवारणीसह इतर ठिकाणी तपासणी सुरू केली आहे. सलमान खानला डेंग्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बीएमसीच्या पथकाने गॅलेक्सी अपार्टमेंट आणि त्याच्या लगतच्या भागात जाऊन औषध फवारणी केली. तपासादरम्यान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दोन ठिकाणी बीएमसीच्या टीमला डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. मात्र, तपासात सलमानच्या घरात अळ्या सापडल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. सध्या खबरदारी म्हणून फनिंग वगैरे करण्यात आले आहे.
डेंग्यूमुळे यावेळी सलमान खान 'बिग बॉस 16' वीकेंड का वारमध्येही दिसला नाही. त्याची कमान करण जोहरने घेतली. यासोबतच त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचे शूटिंगही थांबवण्यात आले आहे. अलीकडेच, सलमान डेंग्यूतून बरा झाला आहे. त्यानतंर तो पहिल्यांदाच आयुष शर्माच्या पार्टीत दिसला होता. 26 ऑक्टोबरपासून तो पुन्हा शूटिंग सुरू करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
'किसी का भाई किसी की जान' ईदच्या दिवशी होणार रिलीज
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, पण काही कारणास्तव त्याची रिलीज डेट वाढवण्यात आली आहे. आता हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.