घाटातून जाताना भरधाव बस रस्त्यावर उलटली; पाच महिन्याच्या बाळासह ५ प्रवाशांचा मृत्यू

jharkhand accident news : भरधाव बस रस्त्यावर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच महिन्याच्या बाळासह ५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
Beed accident
representative imageSaam tv
Published On
Summary

झारखंडच्या करडेगा घाटात भीषण बस अपघात

अपघातात पाच महिन्यांच्या बाळासह ५ जणांचा मृत्यू झाला

दुर्घटनेत ३७ प्रवासी जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

झारखंड-छत्तीसगड सीमेवर शुक्रवारी भीषण अरघाताची घटना घडली आहे. झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील करडेगा घाटात भरधाव बस रस्त्यावर उलटली. या अपघातात ५ महिन्यांच्या बाळासह ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत ३७ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातात मृत्युमुखी झालेले व्यक्ती आणि जखमी रहिवासी हे सिमडेगा आणि छत्तीसगड भागातील आहेत. या भीषण अपघातात सिमडेगा येथे राहणाऱ्या संपत्ती देवी, दिगेश्वर आणि ५ महिन्याचे बाळ घनश्यामचा मृत्यू झाला. तर छत्तीसडच्या जशपूर जिल्ह्यातील महेश राम आणि विमला देवी यांचाही मृत्यू झाला. अपघातातील जखमींना कुनकुरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Beed accident
भाजप नेत्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवला तिसरा क्रमांक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील कुरडेग हून जयपूरच्या कुनकरीच्या यात्रेसाठी बस सकाळी ९ वाजता निघाली होती. बस निघाल्यानंतर कुनकुरीच्या जवळपास १४ किलोमीटर अंतरावर पोहोचली. त्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं.

बस एका निर्माणाधीन घराला धडकली. त्यानंतर बस रस्त्यावर उलटली. या अपघातात पाच जण दगावले. बसचा अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णावहिका घटनास्थळी पोहोचली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पोलिसांनी घाटावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे सिमडेगा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Beed accident
बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड; मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्याची पक्षात एन्ट्री होणार, बैठकीत नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

तत्पूर्वी, बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक आणि कारची एकमेकांना जोरदार धडक झाली. या अपघातात ५ लोकांचा मृत्यू झाला. तर दोन लोक गंभीर जखमी झाले. अपघाताची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com