

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमदारांसोबत घेतली बैठक
बैठकीत निशांत कुमार यांच्या जेडीयू पक्ष प्रवेशाबाबत चर्चा
निशांत कुमार जेडीयू पक्षात प्रवेश करणार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची शुक्रवारी सायंकाळी सरकारी निवासस्थानी आमदार आणि मंत्र्यांसोबत महत्वपूर्ण बैठक झाली. नितीश कुमार राज्यसभेत जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नितीश कुमार यांच्या निर्णयाला काही आमदारांनी विरोध केला. परंतु ते राज्यसभेवर जाणार असल्याचे निश्चित झालं आहे.
जनता दल यूनायटेडच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या पक्ष प्रवेशाविषयी चर्चा झाली. त्यानंतर निशांत कुमार हे रविवारी जनता दल युनायटेड पक्षात प्रवेश करणार आहे.
बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराज आमदारांना आश्वासन दिलं की, 'मी राज्यसभेवर जाणार आहे. परंतु तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही. आपण बिहारमध्येच राहू. बिहारच्या विकासावर लक्ष दिले जाईल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही'. या बैठकीत जेडीयूचे वरिष्ठ नेते संजय झा, मंत्री अशोक चौधरी आणि विजय चौधरी उपस्थित होते. परंतु निशांत कुमार गैरहजर होते.
कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय झा यांनी बैठकीत निशांत कुमार हे जेडीयू पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. निशांत यांना पक्षात प्रवेश देण्याचा प्रस्तावास सर्व आमदारांनी हात वर करून सहमती दिली. याआधी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिंह यांची नितीश कुमार यांच्या चर्चा झाली.
या बैठकीत बिहारच्या राजकीय समीकरणाविषयी चर्चा झाली. नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणे रणनीतीचा भाग मानला जात आहे. तर निशांत यांना पक्षात प्रवेश देऊन बिहारच्या राजकारणात जेडीयू नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. यामुळे आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.