

स्वामी गोविंदगीरी महाराजांच्या वक्तव्यावर उद्धव महाराज मंडलिक यांनी प्रतिक्रिया
त्या वक्तव्याचे खंडन करत उद्धव महाराज मंडलिक यांची नाराजी व्यक्त
सचिन बनसोडे, साम टीव्ही
स्वामी गोविंदगीरी महाराज हे आपल्या परिवारातले प्रमुख आहेत. पण परिवारातले कोणी चुकले तर वेदना प्रकट करणे हे आपलं काम आहे. त्यामुळे मी त्यांनी संतांबाबत केलेल्या वक्तव्याचे खंडन करतो, असं हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी म्हटलंय. यासोबतच त्यांनी वारकरी संप्रदाय अतिपुरोगामी लोकांमागे देखील जाणार नाही, कारण हे लोक संताचे नाव घेऊन देवा धर्मावरच घाला घालतात,असं वक्तव्य उद्धव महाराजांनी केलयं.
पुण्यातील एका कार्यक्रमात अयोध्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगीरी महाराज यांनी संतपरंपरेबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. “दासबोध हाच खरा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत हे गीतेवरील भाष्य आहेत, तर तुकाराम गाथा आणि संत नामदेव यांच्या रचना या संकलन आहेत,” असे वक्तव्य त्यांनी पुण्यात आयोजित ज्ञानोबा ते तुकोबा या राष्ट्रीय चर्चासत्रात केले होते. त्यावरून वारकरी संप्रदायात नाराजी दिसून येतय. नेवासा तालुक्यात कीर्तन सेवेत बोलताना उद्धव महाराज मंडलीक गोविंदगिरी यांच्या वक्तव्यासह अतीपुरोगामी विचारांच्या लोकांबाबत भाष्य केलंय.
ग्रंथाबाबत तुलना करू नये. वारकऱ्यांना खेद झालाय. गोविंदगिरी महाराज आपल्या परिवारातलेच आहेत. मात्र परिवारातला माणूस चुकला तरी मनाला वेदना होतात.. वेदना प्रकट करणे हे आपले कामच आहे. कुणीही चुकू नये. एका बाजूला अती पुरोगामी विचार करणारे लोक आहेत.. वारकरी पंथ त्यांच्याही मागे जाणार नाही. कारण अतिपुरोगामी विचार करणाऱ्या लोकांना देव आणि धर्म मान्य नाही.
पुरोगामी लोक तुकोबाराय, माऊलींचा, संताचा आधार घेतात आणि देवा धर्मावरच घाला घालतात. नास्तिक लोक पुरोगामित्वाचा नावाखाली त्यांची नास्तिकता घुसडवता. विशिष्ट समुदायाबद्दल बोलणे हे वारकरी पंथाला मान्य नाही. कीर्तनकार सर्व जाती समूहांमध्ये आहेत. तुम्ही ( गोविंदगिरी महाराज ) वरिष्ठ आहात, तुमचा निषेध आम्ही करू शकत नाही. मात्र तुमच्या विचारांचे आम्ही खंडण करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.