Kareena Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singham Again: चेहऱ्यावर जखमा अन् हातात बंदूक, करीना कपूरचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज

Singham Again Movie: दीपिका पदुकोणच्या लेडी सिंघम लूकनंतर आता निर्मात्यांनी करीना कपूरचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे.

Priya More

Kareena Kapoor First Look From Singham Again:

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये (Singham Again) एकापाठोपाठ एका सुपरस्टारसोबत अभिनेत्रींची एन्ट्री होत आहे. 'सिंघम अगेन' हा सर्वात मोठा मल्टीस्टारर चित्रपट म्हणून गणला जात आहे. चित्रपटाची स्टारकास्ट हळूहळू समोर येत आहे.

आता महिनाभराच्या शूटिंगनंतर रोहित शेट्टीने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. दीपिका पदुकोणच्या लेडी सिंघम लूकनंतर आता निर्मात्यांनी करीना कपूरचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) देखील दिसणार असल्याचे कन्फर्म झाले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'सिंघम अगेन' मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक पोस्टर आणि चित्रपटातील पात्राचे नाव समोर आले आहे. अक्षय कुमार आणि अजय देवगणने 'सिंघम अगेन'मधील करिनाचा लूक शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत. चित्रपटात सिंघमची ताकद म्हणून करीना दिसणार आहे. यात तिची भूमिका अवनी सिंघम असणार आहे. म्हणजेच या चित्रपटात ती अजय देवगणची लव्ह इंटरेस्ट असेल.

अजय देवगणने 'सिंघम अगेन' मधील करीना कपूर खानचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'क्रूर, मजबूत आणि सिंघमची ताकद! अवनी सिंघमला भेटा.' तर अक्षय कुमारने करीना फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हिंमत असेल तरच अवनीशी पंगा घ्या.' फर्स्ट लूकच्या फोटोमध्ये दिसत आहे की, करीना कपूरच्या चेहऱ्यावर जखमा आणि हातामध्ये बंदूक घेऊन उभी असलेली दिसत आहे. करीना कपूरच्या या खतरनाक लूकला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या महिन्यात या स्टार्सने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. ज्याची एक एक झलक दिग्दर्शकाने सोशल मीडियावर शेअर केली होती. आता या चित्रपटातील करीनाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला होता. रोहित शेट्टीचा हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT