बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) 'टायगर ३' (Tiger 3 Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. मनीष शर्माच्या 'टायगर ३' टीमची दिवाळी खूप उत्साही असणार आहे.
हा चित्रपट सलमानच्या करिअरला संजीवनी देणारा ठरतो की नाही हे 'टायगर ३' रिलीज झाल्यानंतरच समोर येईल. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. यावरूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील जादू दाखवेल असं चित्र दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'टायगर ३' चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कामगिरी करत आहे. नुकताच समोर आलेल्या अहवालांनुसार, चित्रपटाने सुमारे २.८८ लाख तिकिटे विकली आहेत. रिलीज पूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे ८.०१ कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. हे पाहून चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सलमान खानच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या 2D आवृत्तीने २ लाख ७४ हजार तिकिटे विकली असून ७.४४ कोटी रुपये कमावले आहेत. हिंदी IMAX 2D, हिंदी 4DX, हिंदी ICE आणि तेलुगू 2D सह मंगळवार अखेरपर्यंत एकूण तिकिटे विकली गेली. १०३८३ शोच्या २,८८,५१५ तिकिटांची विक्री करण्यात या चित्रपटाला यश आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमा चेन, पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसमध्ये सलमान खानच्या चित्रपटाची क्रेझ सुरू आहे. या चित्रपटाची एक लाख तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत. त्या तुलनेत अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर तीन दिवसांत 'ब्रह्मास्त्र'ची 66 हजार तिकिटांची तर 'गदर 2'ची 62 हजार तिकिटांची विक्री झाली होती.
'टायगर ३' हा चित्रपट 'जवान', 'पठाण', 'गदर २' आणि 'आदिपुरुष' नंतर तिकीट विक्रीच्या बाबतीत यावर्षी पाचव्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. दरम्यान, सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटानंतर सलमान खान लवकरच सूरज बडजात्याच्या चित्रपटात आणि धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात येत असेलेल्या विष्णू वर्धनच्या चित्रपटात दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.