Tiger 3 Advance Booking: 'टायगर ३'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार?, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सलमान खान सज्ज

Tiger 3 Movie Released Date: हा चित्रपट पुढच्या महिन्यात १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tiger 3 New
Tiger 3 NewSaam Tv
Published On

Tiger 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या बहुप्रतीक्षित 'टायगर 3' चित्रपटामुळे (Tiger 3 Movie) चर्चेत आहे. या चित्रपटाची सलमान खानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मागच्या आठवड्यापासून या चित्रपटाच्या तिकीटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅडव्हान्स बुकिंगला (Tiger 3 Advance Booking) सुरूवात झाली होती. या चित्रपटाच्या तिकीटाचे आतापर्यंत झालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून असा अंदाज लावला जात आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल.

'टायगर 3' चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीव्यतिरिक्त या चित्रपटात रिद्धी डोगरा, कुमुद मिश्रा, रेवती आणि अनंत विदत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'टायगर ३' चित्रपटाची परदेशात चांगलीच चर्चा होत आहे. अशामध्ये या चित्रपटाची भारतामध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार हे आपण जाणून घेणार आहोत.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 'टायगर 3' चित्रपटाची तिकीटे आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीला सुरूवात झाली होती. पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा मोठ्या ओपनिंगचा अंदाज वर्तवणारे सुरुवातीचे प्री-सेल ट्रेंड खूप प्रभावी आहेत. सलमान खानच्या चित्रपटाने रिलीज होण्याच्या १३ दिवस आधीच १,५०,००० अमेरिकी डॉलरच्या तिकीटांची विक्री केली आहे. विक्रीच्या बाबतीत, शाहरुख खानचे दोन चित्रपट 'जवान' आणि 'पठाण'ने यावर्षी परदेशी बॉक्स ऑफिसला अनपेक्षित उंचीवर नेले आहे.

Tiger 3 New
Harrdy Sandhu News: ‘मिठी मारली आणि अचानक...’ भरकार्यक्रमात चाहतीच्या कृत्याने पंजाबी गायक भडकला

'टायगर ३' चित्रपटाचे भारतामध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग कधीपासून सुरू होणार याची माहिती ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. टायगर 3' चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आगाऊ बुकिंगवरूनच हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कलेक्शन करू शकतो याचा अंदाज येऊ शकतो. सलमान खानचा टायगर 3 'जवान' चित्रपटाचा विक्रम मोडू शकेल का? हे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.

Tiger 3 New
Raghuveer Khedkar: मराठा आरक्षणाला तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांचा पाठिंबा, पुढचे १५ दिवस कार्यक्रम न करण्याचा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com