अनेकदा लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायकांसोबत चुकीच्या घटना घडताना आपण पाहतो. या घटना फक्त महिला गायिकांसोबतच नाही तर अनेकदा पुरुष गायकांसोबतही घटना घडते. अशीच एक घटना गायक हार्डी संधू याच्यासोबत घडली आहे. नुकताच त्याला एका कार्यक्रमामध्ये वाईट अनुभव आला आहे. हा अनुभव त्याने एका मुलाखतीतून शेअर केला आहे. त्याने केलेल्या ह्या खुलाश्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
एका खासगी कार्यक्रमामध्ये त्याच्यासोबत एका महिला चाहतीने हा प्रकार केल्याचे त्याने सांगितले. हा अनुभव गायकाने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. मुलाखतीमध्ये हार्डी संधु म्हणाला, “एका कार्यक्रमामध्ये मी स्टेजवर परफॉर्म करत होतो. त्यावेळी एका महिला फॅनने मला स्टेजवर यायचं आहे, असा आग्रह केला. यावेळी मी त्या महिलेला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. माझ्यासोबत हा प्रकार दिड ते दोन वर्षांपूर्वी घडलेला होता.” (Social Media)
पुढे मुलाखतीत हार्डी संधुने सांगितले की, “ती महिला जेमतेम ३० ते ४० वयोगटातली होती. तिच्या हट्टापायी मी तिला स्टेजवर यायला सांगितलं. त्यानंतर तिने मला तिच्यासोबत एका गाण्यावर डान्स करायला सांगितले. तिला मी हो बोलताच तिने गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली. पण तिने माझ्यासोबत एक खूपच किळसवाणा प्रकार केला, ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता..” (Actors)
“पुढे डान्सनंतर त्या चाहतीने मी तुला एकदा मिठी मारू शकते का?, असं मला विचारलं. त्यावर मी तिला मिठी मारण्यासाठी परवानगीही दिली. त्यानंतर त्या चाहतीने हार्डीला मिठी मारली आणि अचानक त्याचे कान चाटले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मला खूप मोठा धक्का बसला. जरा विचार करा जर माझ्याकडून असा प्रकार घडला असता, तर काय घडलं असतं? पण, या अशा गोष्टी आपल्याला देखील सहन कराव्या लागतात.” असं मुलाखतीत हार्डीने सांगितले. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.