Ranveer Singh Don 3 Look : हातात बंदूक डोळ्यावर गॉगल; 'डॉन ३' साठी रणवीर सिंग सज्ज

Ranveer Singh Shared Post : रणवीरने सोशल मीडियावर आपले लहानपणीचे फोटो शेअर करत आगामी चित्रपट 'डॉन ३' साठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.
Ranveer Singh
Ranveer SinghSaam Tv

Ranveer Singh Shared Post For Amitabh Bachchan And Shah Rukh Khan

एनर्जीचा बादशाह म्हणून रणवीर सिंगला ओळखले जाते. रणवीर सिंग (Ranveer Singh)नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. रणवीर सिंग हा नेहमी चर्चेत असतो. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'डॉन ३' मुळे चर्चेत आला आहे.

रणवीर सिंगने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. रणवीर नेहमीच सोशल मीडियावरुन काही न काही शेअर करत असतो. नुकतेच त्याने आपल्या लहानपणाचे फोटो शेअर केले आहेत. रणवीरचे हे फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

Ranveer Singh
Abhishek Bachchan Trolls Young Actors: सिक्स ॲब्स बनवणाऱ्या अभिनेत्यांना अभिषेक बच्चनने सुनावलं; म्हणाला, ‘फिटनेसपेक्षा...’

रणवीरने सोशल मीडियावर आपले लहानपणीचे फोटो शेअर करत आगामी चित्रपट 'डॉन ३' (Don 3)साठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून 'डॉन' चित्रपटामुळे वाद सुरू होता. डॉन चित्रपटात आता शाहरुख (Shah Rukh Khan) नव्हे तर रणवीर दिसणार असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु रणवीरच्या या पोस्टने प्रेक्षकांची नाराजी दूर झाल्याचे दिसत आहे.

रणवीर सिंग या फोटोंमध्ये खूप क्यूट दिसत आहे. लहानपणीचा रणवीर आणि आताचा रणवीर यात खूप जास्त फरक आहे. या फोटोत रणवीरने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट तर निळ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. हातात बंदूक घेऊन रणवीरने सेम डॉनसारखी पोझ दिली आहे.. तर एका फोटोत काळ्या रंगाचा गॉगल घालून शहाण्या बाळासारखी पोझ दिली आहे. तर दुसऱ्या फोटोत काहीतरी अतरंगी करताना दिसत आहे.

या पोस्टवर रणवीरने कॅप्शनही दिले आहे. 'मी खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. लहानपणापासूनच मी चित्रपटांच्या प्रेमात आहे. आपल्या सगळ्यांसारखाच मीही अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)आणि शाहरुख खान यांना पाहून मोठा झालो आहे. त्यांना चित्रपटात पाहत आलोय त्यांची पूजा करत आलोय.

हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकार (G.O.A.T)आहे. मी मोठे होऊन त्यांच्यासारखे व्हायचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्यामुळेच मला अभिनेता आणि 'हिंदी चित्रपटाचा नायक' व्हायचे होते. त्यांचा माझ्या आयुष्यावर असलेला प्रभाव शब्दात सांगता येणार नाही. त्यांनी मला माणूस आणि कलाकार म्हणून आकार दिला आहे. त्यांचा वारसा पुढे नेणे हे माझे स्वप्न होते.

'डॉन' (Don Movie)या चित्रपटाचा भाग होणे ही माझ्यावर असलेली खूप मोठी जबाबदारी आहे हे मला जाणवत आहे. मला आशा आहे की, प्रेक्षक मला संधी देतील आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतील.

Ranveer Singh
Aai Kuthe Kay Karte : पुन्हा वादळ येणार! अरुंधती-अनिरुद्धनंतर देशमुखांच्या घरात अजून एक नात संपणार

ज्याप्रकारे माझ्या असंख्य चित्रपटांना त्यातील पात्रांवर प्रेम केले अगदी तसेच. या पात्रासाठी माझी निवड केल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फरहान आणि रितेशचे आभार. मला आशा आहे की, मी तुमचा विश्वास आणि अपेक्षा पूर्ण करू शकेन. अमिताभ बच्चन आणि एसआरके हे दोघं दिग्गज आहेत.

तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं काम मी करेन अशी मला आशा आहे. माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, मी तुम्हाला वचन देतो की नेहमीप्रमाणेच मी तुमचं डॉनमधून मनोरंजन करेन. माझ्यावर केलेल्या प्रेमासाठी सर्वांचे आभार' असं कॅप्शन रणवीरने दिले आहे.

रणवीरच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील इतर कलाकरांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की कहानी' बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. तर आता रणवीरच्या 'डॉन ३' साठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com