Ajay Devgn Career: पद्मश्री विजेता विशाल देवगण आहे तरी कोण? अजय देवगणशी आहे खास नातं

Birthday of Ajay Devgn: अजय देवगणला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे
Ajay Devgn
Ajay DevgnSaam Tv

Ajay Devgn Birthday Special: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आज वाढदिवस आहे. अजय आज ५४ वर्षाचा झाला आहे. अजयचा जन्म २ एप्रिल, १९६९ मध्ये एका पंजाब हिंदू सारस्वत विश्वकर्मा कुटुंबात झाला. अजय देवगणचे कुटुंब सिनेसृष्टीही निगडित आहे. आज अजयच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्याविषयी बरंच काही.

अजय देवगणचं खरं नाव विशाल वीरू देवगण आहे. अजयचे वडील वीरू देवगण स्टंट कोरिओग्राफर आणि ऍक्शन चित्रपट दिग्दर्शक होते. तर त्याची आई वीणा एक चित्रपट निर्माती आहे. अभिनयासह अजय देवगण आता दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता देखील आहे.

अजय देवगणला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१६ मध्ये अजय देवगणला भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अजयने १९९१ मध्ये आलेल्या फुल ओर कांटे चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरूवात केली.

Ajay Devgn
Aishwarya Rai: "हीची हेअरस्टाईल बदला रे...", ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या सोशल मीडियावर पुन्हा झाली ट्रोल

त्यानंतर अजय अनेक चित्रपटांचा भाग झाला. जिगर, दिलवाले, दिलजले, हम दिल दे चुके सनम, कंपनी, दिवानगी, जख्म, द लिजेंट ऑफ भगत सिंह, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिंघम, सिंघम रिटर्न्स, गोलमाल अगेन, टोटल धमाल, रनवे, तान्हाजी, दृश्यम, दृश्यम २ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

अजय देवगणने २४ फेब्रुवारी, १९९९ला पारंपरिक महाराष्ट्रीयन हिंदू पद्धतीने लग्न केले. अजय आणि काजोल यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी न्यासचा जन्म २००३ साली झाला तर मुलगा युगचा जन्म २०१० साली झाला. मुंबईमध्ये २००० साली अजयने त्याच्या निर्मिती कंपनी 'अजय देवगण फिल्म्स'ची स्थापना केली. या निर्मिती संस्थेच्या बॅनर खाली 'राजू चाचा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

अजयने २००८मध्ये 'यु मी ओर हम' या नाटकावर आधारित चित्रपटाची सह०निर्मिती केली. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. अजयने आणखी तीन लेखकांसह हा चित्रपट लिहिला आहे. तर त्याने आणि काजोलने या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com