Actress Kangana Ranaut Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Net Worth : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; कंगनाची संपत्ती वाचून डोळेच फिरतील, शिक्षण किती झालंय माहितीये?

Actress Kangana Ranaut Net Worth : लोकसभा २०२४च्या लोकसभा निवडणूकीसाठी कंगना रणौत उभी राहिली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिने तिच्या संपत्तीची माहिती दिली आहे. जाणून घेऊया, अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल

Chetan Bodke

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने अभिनय क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. लोकसभा २०२४च्या निवडणूकीच्या माध्यमातून कंगना रणौत राजकारणात प्रवेश करणार आहे. अभिनेत्रीने नुकताच हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेसाठी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक अर्ज दाखल केला आहे. सध्या अभिनेत्री कमालीची चर्चेत आली आहे.

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिने तिच्या संपत्तीबद्दल माहिती दिली आहे. जाणून घेऊया, कंगना रणौतकडे (Kangana Ranaut) नेमकी किती संपत्ती (Net Worth) आहे?

गेल्या २४ वर्षांपासून कंगना बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिची एकूण संपत्ती १०० कोटींच्या आसपास आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीकडे २८. ७ कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर ६७. ९ कोटींपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आहे. तर, प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, कंगनाकडे ५ कोटींचे दागिने, ३ कोटींची हिऱ्यांचे दागिने आणि ५० लाखांची चांदी आहे. तर अभिनेत्री लक्झरियस कार्सचीही चांगलीच शौकिन आहे. अभिनेत्रीकडे अनेक लक्झरियस कार्स आहेत.

कंगना रणौत हिच्याकडे, ९८ लाखांची BMW, ५८ लाखांची Mercedez Benz, ३.९१ कोटींची Mercedes-Maybach GLS, ५३,००० Vespa Scooter, २ लाखांची रोकड, १.३५ कोटींची बँक बँलेंस असून १७ कोटींचं कर्ज आहे. अभिनेत्रीकडे चंदिगडमध्ये, मुंबईत आणि मनालीमध्ये अशा ठिकाणी चार व्यावसायिक मालमत्ता आहेत.

कंगनाकडे मुंबईत १६ कोटी रुपयांचे तीन फ्लॅट तर मनालीमध्ये एक बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. कंगनाने असा दावाही केला की २०२२- २३ मध्ये तिची आर्थिक कमाई ४ कोटी रुपये इतकी झाली होती. तर २०२१ मध्ये तिने १२.३ कोटी रुपये कमावले होते.

कंगना रणौतच्या नावावर जवळपास ५० एलआयसी पॉलिसी आहेत. तर तिच्या नावावर आठ गुन्हे दाखल आहेत. कंगना ग्रॅज्युएट असून तिने चंदीगढमधील एका खासगी शाळेतून १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

कंगनाने वयाच्या १८ व्या वर्षी 'गँगस्टर' चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. कंगना सध्या पूर्ण वेळ निवडणूकीच्या प्रचारात व्यग्र आहे. मंडीतून तिकीट जाहीर झाल्यानंतर लगेचच कंगनाने हिमाचल प्रदेशात अनेक रॅली काढल्या आहेत.

ती कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने स्वत:ची तुलना थेट बिग बींसोबतच केली होती. त्यामुळे ती तुफान ट्रोल झाली होती. हिमाचल प्रदेशमध्ये १ जून रोजी मतदान होणार आहे.

कंगना रणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' हा पीरियड ड्रामा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असून कंगना स्वत: या चित्रपटाचं दिग्दर्शन ती करत आहे. या व्यतिरिक्त कंगना पॅन इंडिया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे, त्या चित्रपटामध्ये कंगना आर माधवनसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :पोस्टल मतदानात शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष बांगर आघाडीवर

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT