विश्वासार्ह लोकसेवक बनण्यास मी उत्सुक, Kangana Ranaut ने भाजपकडून तिकीट मिळताच मानले आभार

Mandi Loksabha Constituency: तिकीट मिळाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत कंगना रनौतने भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत. कंगना रनौतचे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Kangana Ranaut On BJP
Kangana Ranaut On BJPSaam Tv

Kangana Ranaut Post:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार आहे. कंगना रनौतला भाजपकडून (BJP) तिकीट देण्यात आले आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तिकीट मिळाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत कंगना रनौतने भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत. कंगना रनौतचे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

कंगनाने ट्वीटमध्ये असे लिहिले की, 'माझ्या प्रिय भारताचा आणि भारतीय जनतेचा आपला पक्ष भारतीय जनता पार्टीला नेहमीच माझा बिनशर्त पाठिंबा राहिला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला मंडी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. कंगना रनौतने पुढे लिहिले की, 'मी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत हायकमांडच्या निर्णयाचे पालन करते. अधिकृतपणे पक्षात सहभागी होण्यासाठी मी सन्मानित आणि उत्साहित आहे. मी एक सक्षम 'कार्यकर्ता' आणि एक विश्वासार्ह लोकसेवक बनण्यास खूप उत्सुक आहे.'

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान भाजपने रविवारी १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतलाही तिकीट दिले आहे. ती हिमाचलमधील मंडी येथून निवडणूक लढवणार आहे. याशिवाय भाजपने दुमका येथून हमेत सोरेन यांची मेहुणी सीता सोरेन यांना तिकीट दिले. नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Kangana Ranaut On BJP
Shah Rukh Khan: IPL ची मॅच पाहताना सिगारेट ओढताना दिसला शाहरुख खान, VIDEO होतोय व्हायरल

यासोबतच भाजपने पश्चिम बंगालच्या तमलूक मतदारसंघातून न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनाही उमेदवारी दिली आहे. गंगोपाध्याय यांनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या काही तास आधी कुरुक्षेत्राचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना कुरुक्षेत्रातूनच उमेदवारी दिली आहे.

Kangana Ranaut On BJP
Shraddha Kapoor आणि Rahul Modi यांचं रिलेशनशीप कन्फर्म, दोघांच्याही कुटुंबीयांना आवडली जोडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com