ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक भाज्यांमध्ये लसूण हा टाकला जातो. लसूण टाकल्याने भाजीची चव आणि सुगंध देखील वाढतो.
लसूण खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. लसणाचे सेवन केल्याने पोट साफ राहण्यास मदत होते.
पण लसूण सोलणे खूप कंटाळवाणे आणि वेळखाऊ वाटते. तर जाणून घ्या लसूण सोलण्याच्या सोप्या आणि घरगुती टिप्स
लसूण सोलण्यापूर्वी १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यात भिजवल्यामुळे लसणाची साले मऊ होतील, ज्यामुळे सुरीने सोलणे सोपे होईल.
लसणाच्या पाकळ्या मायक्रोवेव्हमध्ये टाका आणि ३० सेकंद फिरवा. मायक्रोवेव्हमध्ये लसणाचे साल कडक होईल आणि लसूण सोलणे सोपे होईल.
गॅसवर तवा ठेवून तो गरम करा. त्यावर लसणाच्या पाकळ्या ठेवा. तवा गरम होताच, लसणाची साल जळण्यास सुरुवात होईल आणि अपोआप लसूण सोलला जाईल.
या सोप्या टिप्स वापरुन तुम्ही सहज लसूण सोलू शकता. त्यासाठी जास्त प्रयत्न ही करावे लागणार नाही.