ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल प्रत्येक घरात नॉन स्टिक भांड्यांचा वापर केला जातो. हि भांडी दिसायला सुंदर असतात आणि गॅस बरोबरच हि भांडी इंडक्शन मध्ये देखील वापरली जातात.
नॉन-स्टिक भांडी लवकर जळतात आणि गंजू शकतात. म्हणून, त्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे.
जर तुमचा नॉन-स्टिक भांड्यातील तवा जळल्यामुळे खडबडीत झाला असेल, तर साफ करण्याचे सोपे उपाय जाणून घ्या.
जेवणात वापरला जाणारा बेकिंग सोडा हा क्लिनिंग एजेंट म्हणून ओळखला जातो. बेकिंग सोड्याने जळलेली भांडी सहज साफ करता येतात.
सर्वातआधी गरम पाणी करुन घ्या. गरम पाण्यात मीठ टाकून मिश्रण बनवा.
आता या मीठाच्या पाण्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करुन मिश्रण बनवून घ्या.
तयार केलेले मिश्रण तव्यावर टाका आणि ५ मिनिटे तव्यावर ठेवून द्या.
आता जळलेल्या तव्याला स्वच्छ करण्यासाठी स्पंजचा वापर करा. स्पंज जळलेला तवा स्वच्छ करण्यास मदत करेल.
तव्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात मिक्स करुन तव्यावर टाका आणि स्पंजने घासून स्वच्छ करा.
या टिप्स वापरल्यास तुमचा नॉन स्टिक तवा स्वच्छ होण्यास मदत होईल आणि नव्यासारखी चमक देईल.