Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

Kangana Ranaut Latest News : मी लोकसभा निवडणुकीत जिंकल्यास बॉलिवूडला रामराम करणार, अशी मोठी घोषणा कंगनाने केली आहे. कंगनाच्या वक्तव्यामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSaam Digital

मुंबई : बॉलिवूडची क्विन कंगना रणौतला लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. कंगना ही हिमाचलमधील मंडीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर तिने जोरदार प्रचार सुरु केला आहे. याचदरम्यान, मी लोकसभा निवडणुकीत जिंकल्यास बॉलिवूडला रामराम करणार, अशी मोठी घोषणा कंगनाने केली आहे. कंगनाच्या वक्तव्यामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान कंगना रणौतने मोठी घोषणा केली आहे. कंगनाने लोकसभा निवडणूक जिंकल्यास बॉलिवूड सोडणार असल्याची घोषणा केली. तिने बॉलिवूड सोडून पूर्णवेळ राजकारणाला वेळ देणार असल्याचं ठरवलं आहे. निवडणूक जिंकल्यास पुढे काय करणार, या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'मी सिनेमाच्या कामानेही कंटाळली आहे. मला राजकारणात यश मिळाल्यास, लोक सोबत राहतील, तर मी राजकारणच करेल. मी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे'.

Kangana Ranaut
Kangana Ranaut Bought New Car: कंगना रनौतने खरेदी केली कोट्यवधींची आलिशान कार, किंमत वाचून बसेल धक्का

'लोकांना माझी गरज असेल, तर मी त्या दिशेने काम करेल. मला अनेक फिल्ममेकर म्हणाले की, 'राजकारणात नको जाऊ'. माझ्या वैयक्तिक महत्वकांक्षेसाठी लोक म्हणत आहे की, हे योग्य नाही. मी प्रिविलेज आयुष्य जगले आहे. आता लोकांना जोडण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे त्याला पूर्ण करु इच्छित आहे. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे'.

Kangana Ranaut
Kangana Ranaut | कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया | Marathi News

राजकारण आणि सिनेजगतात किती फरक आहे?

राजकारण आणि सिनेसृष्टीच्या प्रश्नावर अभिनेत्री कंगना म्हणाली, 'सिनेसृष्टी आणि राजकीय आयुष्य खूप वेगळं असतं. सिनेसृष्टीतील आयुष्य एक खोटं आयुष्य असतं. तिथे वेगळं आयुष्य भासवलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळं आयुष्य भासवलं जातं. तर राजकारण हे एक वास्तव आहे. मी लोकसेवेत नवीन आहे. मला खूप काही शिकायचं आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com