Kangana Ranaut Net Worth: फ्लॉप चित्रपट देऊनही ‘पंगा गर्ल’ करते करोडोंची कमाई, कंगना रणौत आहे इतक्या कोटींची मालकीण

Kangana Ranaut Birthday: बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना रणौत कोट्यवधींची मालकीण आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.
Kangana Ranaut Net Worth
Kangana Ranaut Net WorthInstagram

Kangana Ranaut Net Worth News

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना रणौत म्हटलं की वाद आलाच. आज या पंगा गर्लचा ३७ वा वाढदिवस आहे. अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून कंगना आपली भूमिका लिलया पार पाडताना दिसत आहे. कायमच आपल्या वादग्रस्त चर्चेत राहणाऱ्या कंगनाच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. कंगनाने तिच्या आजवरच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनामनात घर केलं आहे. असं असलं तरीही ती आज कोट्यवधींची मालकीण आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत. (Bollywood)

Kangana Ranaut Net Worth
Nayanthara Net Worth: अलिशान घर, महागड्या कार आणि अन् प्रायव्हेट जेट; कोट्यवधींची मालकीण आहे 'जवान' फेम नयनतारा

कंगना रनौतचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील भंबाला येथे झाला. मंडी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या कंगनाचे वडील व्यवासायिक आणि आई शिक्षिका आहे. कंगनाला शिक्षणात रस नव्हता. अभिनेत्री बारावीच्या परीक्षेत नापास झाली होती. तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री होण्यासाठी तिच्या घरातून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने घर सोडलं आणि वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी मुंबई गाठली. एक यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी कंगनाने फार स्ट्रगल केले. कंगना आज तब्बल १२५ कोटींची मालकीण आहे. (Kangana Ranaut)

मीडिया रिपोर्टनुसार, कंगना एका चित्रपटासाठी जवळपास १३ ते १५ कोटीं इतके मानधन आकारते. अभिनयासोबतच कंगना ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेसच्या माध्यमातूनही कमावते. कुठल्याही प्रॉडक्टची ब्रँडिंग करण्यासाठी कंगना ४ ते ५ कोटी रुपये इतके मानधन आकारते. अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून कंगना आज तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘मणिकर्णिका फिल्म्स’ हे प्रॉडक्शन हाऊस कंगनाचं स्वत:च्या मालकीचं आहे. (Bollywood Film)

Kangana Ranaut Net Worth
Elvish Yadav: ५ दिवसांनंतर एल्विश यादव तुरुंगाबाहेर, कोर्टाने केली जामिनावर सुटका

कंगनाकडे अलिशान घरं सुद्धा आहे. मुंबईमध्ये एक लक्झरियस फ्लॅट त्यासोबतच मनालीमध्ये जमीन खरेदी करून कंगनाने अलिशान बंगला देखील बांधला आहे. तिच्या या दोन्हीही घराची किंमत आज कोट्यवधींच्या घरात आहे. कंगनाच्या मनालीमध्ये असलेल्या तिच्या बंगल्यामध्ये 8 बेडरूम आहेत. तिचे दोन्ही घरं खुपच अलिशान आणि लक्झरियस आहेत. (Bollywood Actress)

कंगना रनौतकडे अनेक अलिशान आणि महागड्या कार आहेत. तिच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज, मर्सिडीज बेंझ जीएलई-क्लास एसयूव्ही अशा महागड्या कार्स आहेत. तिच्या या कारची किंमत 73.7 लाख ते 1.25 कोटीपर्यंत आहे. (Entertainment News)

Kangana Ranaut Net Worth
Shaitaan Movie: बॉक्स ऑफिसनंतर आता OTT वर धाड टाकायला 'शैतान' सज्ज, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com