'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) विनर आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला (Elvish Yadeav) मोठा दिलासा मिळाला आहे. विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टींप्रकरणी अटकेत असलेल्या एल्विश यादवला अखेर जामीन मिळाला आहे. एल्विश यादवच्या जामिनावर आज एनडीपीएसच्या कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने एल्विश यादवला जामीन मंजूर केला. ५ दिवसांनंतर एल्विश यादवची तुरुंगातून सुटका झाली.
बिग बॉस ओटीटी विनर एल्विश यादवला विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करत नोएडा पोलिसांनी १७ मार्चला अटक केली होती. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गेल्या ५ दिवसांपासून एल्विश यादव तुरुंगात होता. एल्विश यादवने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या पहिल्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली नाही. पण आता त्याच्या वकिलांद्वारे दाखल केलेल्या दुसऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून कोर्टाने त्याला जामीन दिला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचक्यावर त्याला जामीन देण्यात आला आहे.
रेव्ह पार्टींमध्ये सापांच्या विषाची व्यवस्था करून दिल्या प्रकरणी एल्विश यादवविरोधात वन्यजीव अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्विशवर एनडीपीएस कायद्या अंतर्गत अनेक गंभीर कलम लावण्यात आले होते. पण नंतर हे कलम हटवण्यात आले होते. नोएडा पोलिसांनी सांगितले होते की, चुकून हे कलम टाइप झाले होते.
एल्विश यादवचे वकील प्रशांत राठी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी कोर्टाला सांगितले की एल्विशला या प्रकरणात खोट्यापद्धतीने अडकवले जात आहे. त्याच्याजवळून एनडीपीएस कलमाचा कोणताही पदार्थ त्याच्याकडे सापडला नव्हता. राहुलकडून पोलिसांना विष मिळाले होते राहुलला आधीच जामीन मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.