Shaitaan Movie: बॉक्स ऑफिसनंतर आता OTT वर धाड टाकायला 'शैतान' सज्ज, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Horror Thriller Film Shaitaan : शैतान चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने अजय देवगणच्या या चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत.
Shaitaan Movie
Shaitaan MovieSaam Tv

Shaitaan Movie Released At OTT Platform:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), आर माधवन (R Madhvan) आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत खूप चांगली कमाई केली आहे. 'शैतान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवर कधी रिलीज होणार याबाबतचे अपडेट्स समोर आले आहेत.

शैतान चित्रपट रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवून दिली. अजूनही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहे. आता प्रेक्षक हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशामध्ये शैतान चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुठे रिलीज होणार हे आपण जाणून घेणार आहोत...

आजकाल चित्रपट रिलीज झाल्यानंतर थिएटरमध्ये एक किंवा दोन महिने चालल्यानंतर हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याचे डिजिटल अधिकार प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी केले जातात. शैतान चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने अजय देवगणच्या या चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बाजूला नेटफ्लिक्सच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

शैतान चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. पण चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही. चमकदार कथा आणि स्टार कास्टच्या दमदार अभिनयामुळे शैतानने चांगली कमाई केली. रिलीजच्या 14 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 118 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने 165 कोटींचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.

Shaitaan Movie
तुलना कोणासोबत करायची याची तरी..., छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या पोस्टवरून Tejaswini Pandit वर नेटकरी संतापले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com