तुलना कोणासोबत करायची याची तरी..., छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या पोस्टवरून Tejaswini Pandit वर नेटकरी संतापले

Tejaswini Pandit: तेजस्विनीने ट्वीट करत त्यामध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाचे विश्लेषण करणाऱ्या लेखाच्या एका भागाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'पुरंदरचा तह... पण राजावर विश्वास...कायम!' , असे लिहिले आहे.
Tejaswini Pandit
Tejaswini Pandit Saam Tv

Tejaswini Pandit Trolled After Tweet:

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. या माध्यमातून ती नेहमी परखडपणे आपली मतं मांडत असते. मग तो सामाजिक विषय असो वा राजकीय विषय. यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. असे असताना देखील ती आपले मत मांडायचे सोडत नाही. अशामध्ये तेजस्विनी पंडितने नुकताच केलेल्या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या ट्विटमुळे तेजस्विनी पंडीतला सध्या ट्रोल देखील केले जात आहे. नेटकऱ्यांनी यावेळी तेजस्विनीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. अशामध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ट्वीट केले आहे. तेजस्विनी पंडित ही नेहमी राज ठाकरेंना पाठिंबा देते. अशामध्ये आता तिने ट्वीट करत त्यामध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाचे विश्लेषण करणाऱ्या लेखाच्या एका भागाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'पुरंदरचा तह... पण राजावर विश्वास...कायम!' , असे लिहिले आहे.

तेजस्विनीच्या या पोस्टवरून तिला आता नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. तेजस्विनीच्या या ट्विटचा संबंध थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी जोडत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तेजस्विनीने ट्विटमध्ये ज्या लेखाचा फोटो जोडला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, 'या तहामुळे स्वराज्याचे तात्कालिक नुकसान नक्कीच झाले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाकडून कैद देखील झाली होती पण हा तह करताना शिवाजी महाराजांनी बरीच मोठी दूरदृष्टी दाखवली होती. जे २३ किल्ले तहामध्ये द्यायचे ठरले होते ते मुळतः मोगलांचेच किल्ले होते. तोरणा, राजगड, शिवनेरीसारखे महत्त्वाचे किल्ले शिवाजी महाराजांना राखून ठेवण्यात यश आले होते. या तहामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल थांबले होते.'

या लेखामध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'आग्रा येथील कैदेतून सुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी परत एक एक किल्ला जिंकण्यास सुरुवात केली. हा तह १३ जून १६६५ रोजी झाला होता आणि तह झाल्यानंतर महाराजांकडे १२ किल्ले उरले होते. पण पुढील १५ वर्षांत म्हणजेच १६८० पर्यंत शिवाजी महाराजांकडे तब्बल २०० किल्ले होते. हा तह जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच सामान्य माणसाला प्रेरणादायी पण आहे. बरेच वेळेस प्रचंड संघर्ष करून यशाचे शिखर गाठल्यावर तिथूनही माघार घेण्याची वेळ आयुष्यात अनेक जणावर येते पण अशी वेळ आल्यावर खचून न जाता परत कसे उभा राहायचे हे शिवाजी महाराजांकडून आणि या तहातून शिकायला मिळते. काही वेळेस स्वीकारलेली तात्कालिक माघार दूरदृष्टीचा विचार करता किती महत्त्वाची असते ही गोष्ट पण पुरंदरचा तह शिकवतो. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे तो याच कारणामुळे. या तहाच्या मूळ प्रती आजही राजस्थानातील बिकानेर येथील संग्रहालयात उपलब्ध आहेत.'

तेजस्विनीच्या या पोस्टवरून तिला आता ट्रोल केले जात आहे. एका युजरने लिहिले की, 'नाही पटलं … तुलना कोणासोबत? तह नाही याला नांगी टाकणे म्हणतात.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ते राजे शिव छत्रपति होते, त्यांनी लहानपणापासून एका क्षणाचीही उसंत न घेता अविरत कष्टाने आणि आपली बुद्धी वापरून जनतेसाठी प्रामाणिकपणे जगले आणि आपलं ध्येय कायम डोळ्यासमोर ठेवले, ते राजे होते आणि हे फक्त राजासारखे जिवन जगत आहेत, यांचा जमिनीवर सामान्य लोकांशी संबंध नाही.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'ईडी घुसली तिथं काय तह आणि प्रत्येक गोष्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दाखले देणं बंद करा. माझ्या राजाने कोणाला लुबाडून खाल्लं नव्हतं. जेवढे आजकाल सत्तेत जात आहेत असेही एकाने म्हटले. तुलना कोणासोबत करायची याची तरी लाज राखा.'

Tejaswini Pandit
Swatantrya Veer Savarkar Twitter Review: रणदीप हुड्डाच्या मेहनतीचं होतंय कौतुक, प्रेक्षकांना फर्स्ट डे फर्स्ट शो कसा वाटला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com