दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नयनतारा आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म १८ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला आहे. नयनतारा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. नयनतारा तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. नयनतारा ही आघाडीची अभिनेत्री असून ती देशातील सर्वात श्रीमंत नायिकांपैकी एक आहे.
एका रिपोर्टनुसार, नयनताराची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे. नयनताराकडे 100 कोटींचे घर आहे. तिच्याकडे चार लक्झरी प्रॉपर्टीज आहेत. तमिळनाडू पासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी नयनताराकडे प्रॉपर्टीज आहे.
नयनतारा तिच्या नवरा विग्नेश शिवनसोबत 4 बीएचके फ्लॅटमध्ये राहते. त्या फ्लॅटची किंमत जवळपास 100 कोटींच्या घरात आहे. तिच्या या घरात प्रायव्हेट थिएटर, जिम, स्विमींग पूल सारख्या सुविधा आहेत. याचसोबत नयनताराचे हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये दोन अपार्टमेंट आहे. या घरांची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे. तसेच नयनताराकडे स्वतः चे प्रायव्हेट जेट आहे. तिच्या या जेटची किंमत 50 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नयनताराकडे अनेक लक्झरी कार आहेत. तिच्याकडे 1.76 कोटींची बीएमडब्ल्यू 7 सीरीज, 1 कोटींची मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यू 5 सीरीज आहे. याचसोबत नयनतारा एक व्यवसायिकादेखील आहे. तिची लिप बाम आणि युएई मध्ये तेल कंपनीमध्ये पार्टनर आहे.
नयनतारा एका प्रोडक्शन कंपनीची सहमालक आहे. ती पती विघ्नेश शिवनसोबत राउडी पिक्चर बॅनर हे प्रोडक्शन हाऊस चालवते. नयनतारा चित्रपटांशिवाय जाहिरातीमधूनही चांगली कमाई करते. ती एका जाहीरातीसाठी 4-7 कोटी रुपये घेते. एका 50 सेकंदाच्या जाहीरातीसाठी तिने 5 कोटी रुपये मानधन घेतले असल्याचे काही रिपोर्टसमधून समोर आले आहे.
नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नयनतारा नुकतीच शाहरुख खानच्या जवान चित्रपटात झळकली होती. तिचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.