

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. धावपळीमुळे हात-पाय दुखतात, चेहऱ्यावरचं तेज निघून जातं, खूप थकवा येतो, इतर कामांसाठी वेळ मिळत नाही, स्वभावात बदल होतात असे बदल तुम्हाला जाणवू शकतात. अनेक मंडळी ही समस्या नेहमीचीच म्हणून दुर्लक्षित करतात. पण यामुळेच तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
काही गंभीर आजारांच्या समस्या किंवा लक्षणं ही नेहमीसारखीच असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने ती वाढत जातात आणि त्यांचा परिणाम एकदाच आपल्याला भोगावा लागतो. अशीच एक समस्या म्हणजे तुमच्या शरीरातलं खराब कोलेस्टेरॉल आहे. तुमच्या रोजच्या सवयींच्या बदलामुळे तुम्हाला या गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं. याचा थेट परिणाम तुमच्या ह्रदयावर होऊ शकतो. तुम्हाला कमी वयातच हार्ट अटॅक सारख्या जीवघेण्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे वेळीच ही लक्षणं ओळखून तुम्ही त्यावर उपचार करु शकता. त्यासाठी पुढील बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
जेव्हा शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच Low-Density Lipoprotein (LDL) वाढतं, तेव्हा तुम्हाला बाहेरुन काही बदल जाणवत नाहीत. पण यासाठी तुम्ही छोट्या छोट्या नेहमीच्या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी डोळ्यांवर लक्ष ठेवावं लागेल. काहींच्या डोळ्यांभोवती किंवा पापण्यांजवळ पिवळसर रंगाचे छोटे डाग किंवा सपाट थर दिसतात. हे त्वचेखाली साचलेल्या कोलेस्ट्रॉलचे असू शकातत. कधी कधी डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा गोल थर दिसतो. पण ४५ वर्षांखालच्या व्यक्तींमध्ये हे दिसत असेल तर शरीरातले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असू शकते.
तुम्हाला यामध्ये हात-पायांना मुंग्या येतात, बधिरपणा किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. पण यामागचं कारण अनेकांना माहितच नसतं. काही वेळा चेहरा किंवा जबड्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्याजवळ चरबी साचल्यामुळे रक्तप्रवाह अडथळला जातो. तसेच अॅसिडिटीची समस्या सारखी जाणवते. तुम्हाला जर ही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि वयाच्या चाळिशीनंतर ते तपासले पाहिजे असं तज्ज्ञांचे मत आहे.
टीप: हा लेख केवळ माहिती देण्यासाठी आहे. कोणतीही लक्षणे दिसल्यास स्वतः निदान करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी हीच कोलेस्ट्रॉलशी संबंधित आरोग्य धोके ओळखण्याचा आणि टाळण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.